"कास्टिंग झालेलं, पण...", मराठीतील लोकप्रिय खलनायिकेला मिळालेली 'दृश्यम ३'ची ऑफर; मग का दिला नकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 12:52 IST2026-02-23T12:51:18+5:302026-02-23T12:52:20+5:30

मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रीला मिळालेली 'दृश्यम ३' ची ऑफर: 'या' कारणासाठी दिला स्पष्ट नकार

marathi television actress vidisha mhaskar why rejected drishyam 3 offer know the reason  | "कास्टिंग झालेलं, पण...", मराठीतील लोकप्रिय खलनायिकेला मिळालेली 'दृश्यम ३'ची ऑफर; मग का दिला नकार?

"कास्टिंग झालेलं, पण...", मराठीतील लोकप्रिय खलनायिकेला मिळालेली 'दृश्यम ३'ची ऑफर; मग का दिला नकार?

Marathi Actress On Drishyam 3: मराठी इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे बॉलिवूडमध्ये काम करतायत. इतकंच नाहीतर ओटीटीवरही मराठी कलाकारांनी आपल्या कामाने सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहेत.  हिंदी चित्रपट, मालिका आणि सीरिजमध्ये मराठी कलाकार कमाल करताना दिसत आहेत. अशातच, मराठीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीने चक्क अजय देवगणच्या गाजलेल्या दृश्यम फ्रॅंचायझीच्या तिसऱ्या भागाची ऑफर नाकारली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती अभिनेत्रीने याबद्दल खुलासा केला आहे. तर कोण आहे ही नायिका जाणून घेऊयात... 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

'बन मस्का', 'हे मन बावरे', 'ती फुलराणी', 'चांदणे शिंपित जाशी', 'रंग माझा वेगळा',' ३६ गुणी जोडी',' पिंगा गं पोरी पिंगा' यांसारख्या मालिकांमध्ये अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेषत विदिशाने साकारलेल्या खलनायिकेच्या भूमिकांना प्रेक्षकांची वाहवाह मिळाली. अशातच नुकतीच अभिनेत्रीने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला हल्ली सोशल मिडिया, फॉलोअर्स बघून काम दिलं जातं. इन्फ्ल्यूएन्सर देखील या क्षेत्रात आले आहेत. त्यामुळे आऊट ऑफ साईड किंवा आऊ ऑफ माइंड जायचं  नाही, असा कधी विचार होता का? याची भीती असते का? असा प्रश्न विचारण्यात आला. 
त्यावर बोलताना विदिशा म्हणाली,"मला याची भीती नाही. मी कधीच कोणाच्या आऊट ऑफ माइंड नाही होऊ शकत. खरंतर हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे. तर हा माझा विश्वास आहे."

या मुलाखतीत अभिनेत्रीने असंही सांगितलं की, दृश्यम ३ साठी तिचं कास्टिंग झालं होतं, पण काही कारणामुळे ती चित्रपटाचा भाग होऊ शकली नाही. मग पुढे विदिशा म्हणाली, "आता मी जर ठरवलं की मला आता थांबायचं आहे मला फक्त वेब सीरिज करायाच्या आहेत. मला चित्रपट करायचे आहेत. तर मी थांबते. कारण, बऱ्याचदा टेलिव्हिजनच्या शूटिंगमुळे माझ्या हातून बरेच सिनेमे गेले आहेत. माझी एक कान्सची फिल्म आणि काही वेब सीरिज मला करता आल्या नाही. दृश्यम ३ साठी देखील माझी कास्टिंग झाली होती... पण, ते सुद्धा मला करता नाही आलं. पिंगा गं पोरी मालिका चालू होती आणि त्यात माझे ट्रॅव्हल डेट्स सगळं क्लॅश होत होतं. एकीकडे ट्रॅव्हल्स डेट्स आणि दृश्यम ३ ची पण सुट्टी हे सगळं एकत्र होणार नव्हतं. त्यामुळे हा प्रोजेक्ट माझ्या हातून गेला. मी सतत व्यस्त असल्यामुळे मला जे करावंस वाटतंय ते करता येत नाही."

का नाकारली ऑफर…

"मी अनेकदा रिजेक्शनचा सामना केला आहे. कलाकार असेल तर त्याला रिजेक्शनचा सामना करावा लागतोच. सुरुवातीला मी ऑडिशन पाठवल्यानंतर दहा-दहा वेळा त्या माणसाला विचारायचे. त्यानंतर मला त्यांचा पॅटर्न कळला. जर तुमचं सिलेक्शन झालं नसेल तर ते रिप्लाय देत नाहीत. 'दृश्यम ३' च्या बाबतीतही तेच घडलं. म्हणून मी माझ्या सुट्ट्या ज्या टाकल्या होत्या त्या कन्फर्म केल्या. त्यानंतर ४ दिवसांनी दृश्यम ३ साठी त्यांचा फोन आला. तेव्हा माझ्या मालिकांसाठी डेट्स तारखा दिलेल्या होत्या. शिवाय आयत्यावेळी मालिकेच्या प्रोडक्शना सांगून त्यांनी मान्य केलं नसतं." असा खुलासा अभिनेत्रीने केला. 

Web Title : मराठी अभिनेत्री विदिशा ने शेड्यूल के कारण 'दृश्यम 3' का प्रस्ताव ठुकराया।

Web Summary : मराठी अभिनेत्री विदिशा, जो खलनायक भूमिकाओं के लिए जानी जाती हैं, ने 'दृश्यम 3' का प्रस्ताव ठुकरा दिया। 'पिंगा गा पोरी' सहित टीवी प्रतिबद्धताओं ने फिल्म की तारीखों के साथ संघर्ष किया। उन्होंने प्रारंभिक रुचि और कास्टिंग के बावजूद मौजूदा प्रतिबद्धताओं को प्राथमिकता दी।

Web Title : Marathi actress Vidisha refused 'Drishyam 3' offer due to schedule clash.

Web Summary : Marathi actress Vidisha, known for villainous roles, declined a 'Drishyam 3' offer. TV commitments, including 'Pinga Ga Pori', conflicted with film dates. She prioritized existing commitments despite initial interest and casting.