वैष्णवीच्या हाताला लागली किरण गायकवाडच्या नावाची मेहंदी; फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:47 IST2024-12-12T13:44:22+5:302024-12-12T13:47:24+5:30
मराठी कलाविश्वात लगीन सराईला सुरूवात झाली.

वैष्णवीच्या हाताला लागली किरण गायकवाडच्या नावाची मेहंदी; फोटो आले समोर
Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar Wedding : मराठी कलाविश्वात लगीन सराईला सुरूवात झाली. तुलशी विवाहनंतर बऱ्याच कलाकारांनी लग्नगाठ बांधून त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. अभिनेत्रा रेश्मा शिंदे, अभिषेक गावकर हे कलाकार नुकतेच लग्नबंधनात अडकले. शिवाय अभिनेत्री हेमल इंगळेच्या केळवणाचे फोटो समोर आले आहेत. त्यात आता मालिकाविश्वात अभिनेता किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर या नव्या जोडीच्या लग्नाची चर्चा होताना दिसते. अलिकडेच वैष्णवीबरोबर मजेशीर व्हिडीओ शेअर करत किरणने लग्नाची तारीख जाहीर केली होती. येत्या १४ डिसेंबरला दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यातच आता दोघांच्याही घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकतेच सोशल मीडियावर वैष्णवी कल्याणकरच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.
अवघ्या काही दिवसांनंतर किरण वैष्णवीशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवणार आहे. अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून मेहंदी सोहळ्याचा खास फोटो शेअर केला आहे. मेहंदीसाठी वैष्णवीने हिरव्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. तर त्यावर साजेसे खड्यांचे दागिने असा साजशृंगार तिने केल्याचा पाहायला मिळतोय. किरण-वैष्णवीच्या लग्नाच्या बातमी कळताच त्यांचे चाहते देखील उत्सुक आहेत.
किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांची पहिली भेट 'देवमाणूस' या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, किरण गायकवाडने 'लागिर झालं जी', 'देवमाणूस' या मालिकांबरोबरच अनेक मालिकांमध्ये काम केले. मराठी सिनेमांमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'चौक', 'फकाट', 'बघतोस काय मुजरा कर' आणि 'डंका हरिनामाचा' या सिनेमांमध्ये तो झळकला आहे. तर वैष्णवी कल्याणकर सुद्धा अभिनेत्री असून तिने 'तू चाल पुढं', 'देवमाणूस २' या मालिकांमध्ये काम केलंय. सध्या ती 'तिकळी' मालिकेत अभिनय करतेय.