जुनं घर सोडताना मराठी अभिनेत्री ढसाढसा रडली अन् नव्या घराची झलकही दाखवली! व्हिडीओ बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:54 IST2025-07-24T15:52:09+5:302025-07-24T15:54:46+5:30
भाड्याच्या घरापासून हक्काच्या घरापर्यंतचा प्रवास! मराठी अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती, व्हिडीओ शेअर करत दाखवली नव्या घराची झलक

जुनं घर सोडताना मराठी अभिनेत्री ढसाढसा रडली अन् नव्या घराची झलकही दाखवली! व्हिडीओ बघाच
Marathi Actress Buy New Home: यंदाच्या वर्षात मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हक्काचं घर घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. प्रत्येकाला आपलं एक हक्काचं घर आणि गाडी असावी असं स्वप्न असतं. आता मालिकाविश्वातील आणखी एका अभिनेत्रीने स्वत:च घर घेत स्वप्न साकार केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे शर्मिला शिंदे आहे. नुकताच या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने नव्या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
'नवरी मिळे हिटलर'ला मालिकेत घराघरात पोहोचलेल्या शर्मिला शिंदेने नुकताच ृतिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर नव्या घराचा सुंदर व्हिडीओ शेअर करत नवीन घर घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. त्याचबरोबर तिने भाड्याच्या घरापासून हक्काचं घर घेण्याचा प्रवास खडतर प्रवास चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शर्मिला जुन्या घराला निरोप देताना ती प्रचंड भावुक झाल्यांच दिसतंय. शर्मिलाने ठाण्यात हक्काचं घर घेतलं आहे. सोशल "आता मी शेवटी या शहराला माझं घर म्हणू शकते, असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे."SHARMILA'S" अशी एक आकर्षक नेमप्लेट तिने तिच्या घराबाहेर लावली आहे. शर्मिला शिंदेंच्या या व्हिडीओवर अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
वर्कफ्रंट
अभिनेत्री शर्मिला शिंदे हा मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये काम करून तिने अभिनयाचा ठसा उमटवला. 'पुढचं पाऊल', 'माझ्या नवऱ्याची बायको' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.