नारळाच्या बागा, सारवलेलं अंगण अन्...; रुपाली भोसले रमली गावाकडच्या वातावरणात, शेअर केला व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 13:50 IST2025-05-09T13:43:56+5:302025-05-09T13:50:00+5:30

गावाकडे रमली मराठी अभिनेत्री, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

marathi television actress rupali bhosale enjoying vacation in konkan video viral | नारळाच्या बागा, सारवलेलं अंगण अन्...; रुपाली भोसले रमली गावाकडच्या वातावरणात, शेअर केला व्हिडीओ 

नारळाच्या बागा, सारवलेलं अंगण अन्...; रुपाली भोसले रमली गावाकडच्या वातावरणात, शेअर केला व्हिडीओ 

Rupali Bhosale: सध्याच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा ब्रेक घेत क्षणभर विश्रांतीसाठी कलाविश्वातील अनेक कलाकार पुण्यासारखी मोठं शहरं सोडून गावाची वाट धरत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कोणी मित्र-मैत्रिणींसोबत ट्रीपवर गेल्याचं पाहायला मिळतंय तर कोणी गावाकडे रमल्याचं दिसतंय. अशातच सोशल मीडियावर एका मराठी अभिनेत्रीचा कोकणातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले (Rupali Bhosale). आपल्या बिझी शेड्यूलमधून थोडासा ब्रेक घेत अभिनेत्री तिच्या कोकणातील मुळगावी पोहोचली आहे. 


रुपाली भोसले ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. आता तिने पोस्ट केलेला एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती गावाकडचं जीवन जगताना दिसत आहे. आजुबाजूला नारळाच्या बागा, आंब्याची झाडे तसेच कोकणातील कौलारु घरं अशा निसर्गाच्या सानिध्यात ची रमली आहे. कोकणात जाणं सोपं आहे पण कोकणातून परत येणं कठीण..., माझं गाव माझं कोकण...! असं कॅप्शन या देत अभिनेत्रीने सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


दरम्यान, रुपाली भोसलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आई कुठे काय करते या मालिकेनंतर नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याशिवाय 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. तसंच काही हिंदी मालिकांमध्येही ती झळकली आहे. 

Web Title: marathi television actress rupali bhosale enjoying vacation in konkan video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.