प्रेक्षकांना धक्का! 'लक्ष्मीच्या पावलांनी' पाठोपाठ आता 'ही' लोकप्रिय मालिका संपणार? सोशल मीडियावर होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 11:53 IST2025-12-15T11:49:22+5:302025-12-15T11:53:01+5:30
दीड वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर 'ही' लोकप्रिय मालिका घेणार निरोप, चाहते नाराज

प्रेक्षकांना धक्का! 'लक्ष्मीच्या पावलांनी' पाठोपाठ आता 'ही' लोकप्रिय मालिका संपणार? सोशल मीडियावर होतेय चर्चा
Television: छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिकांची नांदी पाहायला मिळते आहे. येत्या काही काळात स्टार प्रवाहवर २ नव्या मालिका दाखल होत आहे.'वचन दिले तू मला' आणि मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले, 'तुझ्या सोबतीने' अशी या मालिकांची नावे आहेत. यातील 'वचन दिले तू मला' ही मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.इतर दोन मालिकांची वेळ जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र आता त्यातील 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' या मालिकेची वेळ आणि कधीपासून सुरू होणार ही तारीख समोर आली आहे. येत्या ५ जानेवारी पासून रोज सायंकाळी ७.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. पण, त्यामुळे आता कोणती जुनी मालिका संपणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
'मी सावित्रीबाई जोतीराव फुले'या नव्या मालिकेची वेळ जाहीर होताच घरोघरी मातीच्या चुली ही मालिका निरोप घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका १८ मार्च २०२४ रोजी सुरू झालेली. आता या मालिकेला सुरू होऊन जवळपास दोन वर्ष होत आली आहेत. गेल्या दीड वर्षांत या मालिकेत अनेक नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाले. सध्या मालिकेत प्रेक्षकांना १२ वर्षांपूर्वीचा काळ अनुभवता येत आहे. तसंच जानकी आणि हृषिकेशच्या लग्नापूर्वीची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. अशातच ही मालिका बंद होणार असल्याचं वृत्त समोर येताच प्रेक्षक देखील प्रचंड नाराज झाले आहेत.
घरोघरी मातीच्या चुली ही मालिका अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदेने जानकी तर सुमीत पुसावलेने हृषिकेश ही भूमिका उत्तमरित्या साकारली. जानकी आणि हृषिकेशच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण, आता जवळपास दीड वर्षानंतर ही मालिका संपणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान,याबाबत स्टार प्रवाह वाहिनीकडून किंवा मालिकेतील कलाकारांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.