नांदा सौख्यभरे! 'अशोक. मा. मा' फेम अभिनेत्री रसिका वाखारकरचं थाटात पार पडलं लग्न; फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 15:23 IST2026-01-20T15:21:13+5:302026-01-20T15:23:36+5:30

मराठमोळ्या अभिनेत्रीचं थाटामाटात पार पडलं लग्न, विवाह सोहळ्याचे फोटो होतायेत व्हायरल

marathi television actress rasika wakharakar tie knot with shubhankar umbrani her wedding photos going viral | नांदा सौख्यभरे! 'अशोक. मा. मा' फेम अभिनेत्री रसिका वाखारकरचं थाटात पार पडलं लग्न; फोटो समोर

नांदा सौख्यभरे! 'अशोक. मा. मा' फेम अभिनेत्री रसिका वाखारकरचं थाटात पार पडलं लग्न; फोटो समोर

Rasika Wakharkar Wedding: मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरु असल्याची चर्चा पाहायला मिळतेय. एका पाठोपाठ एक असे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहेत. अलिकडेच महिनाभरापूर्वी प्राजक्ता गायकवाड, कोमल कुंभार अशा अनेक अभिनेत्रींनी लग्नगाठ बांधली. आता नवीन वर्षातही अनेक लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे रसिका वाखारकर. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर रसिका वाखारकरच्या लग्नाची चर्चा रंगली होती. अखेर मोठ्या थाटामाटात रसिका वाखारकरचा लग्नसोहळा पार पडला आहे.तिच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

'पिरतीचा वणवा उरी पेटला' या मालिकमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली रसिका वाखारकर नुकतीच शुभंकर उंब्राणीसोबत विवाह बंधनात अडकली आहे. त्यानंतर तिने अशोक.मा.मा मालिकेतूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता वैयक्तिक आयुष्यात रसिकाने आयुष्याच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे रसिका शुभांकरच्या लग्नाला अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी हजेरी लावली होती. 

दरम्यान, या लग्नसोहळ्यासाठी रसिकाने हिरव्या रंगाची नऊवारी परिधान केली होती. तर शुभंकरने पांढरा कुर्ता परिधान केला होता. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.सध्या संपूर्ण कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Web Title : नांदा सौख्य भरे फेम रसिका वाखारकर ने धूमधाम से शादी की!

Web Summary : 'अशोक. मा. मा' फेम अभिनेत्री रसिका वाखारकर ने शुभंकर उंब्रानी से शादी की। अशोक सराफ की उपस्थिति में शादी हुई, जिसमें रसिका ने हरी नववारी साड़ी पहनी थी। तस्वीरें वायरल हैं, और खुशहाल जोड़े को नई यात्रा शुरू करने पर आशीर्वाद मिल रहा है।

Web Title : Nanda Saukhya Bhare Fame Rasika Wakharkar Ties Knot in Style!

Web Summary : Actress Rasika Wakharkar, known for 'Ashok. Ma. Ma', married Shubhankar Umbrani. The wedding, attended by Ashok Saraf, saw Rasika in a green Navvari saree. Photos are viral, with blessings pouring in for the happy couple as they begin their new journey.