शिवानी सोनार-अंबर गणपुळे लवकरच अडकणार विवाहबंधनात, लग्नापूर्वीच्या विधींना झाली सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 09:06 IST2025-01-06T09:05:34+5:302025-01-06T09:06:31+5:30
मराठी कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत.

शिवानी सोनार-अंबर गणपुळे लवकरच अडकणार विवाहबंधनात, लग्नापूर्वीच्या विधींना झाली सुरुवात
Shivani Sonar Wedding: मराठी मनोरंजन विश्वात कलाकारांची सध्या लगीनघाई सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. बरेच कलाकार यंदा म्हणजेच २०२४ मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यात आता नवीन वर्ष सुरु झालंय आणि अनेकांच्या घरी लग्नाची लगबग सुरु आहे. त्यामधील एक नाव म्हणजे शिवानी सोनार. दरम्यान, 'राजा राणीची गं जोडी' फेम अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar)आणि 'रंग माझा वेगळा' फेम अंबर गणपुळे (Ambar Ganpule) लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. शिवानी सोनारच्या घरी लग्नापूर्वींच्या विधींना सुरुवात झाली. याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शिवानी सोनारने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ती लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत. 'नवरी लग्नासाठी तयार...' म्हणत अभिनेत्रीने इन्स्टग्राम स्टोरीवर तिचा फोटो पोस्ट केलाय. त्याचबरोबर तिच्या घरी लग्नापूर्वींच्या विधींचे फोटो सुद्धा तिने पोस्ट केले आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये देखील शिवानी-अंबरच्या लग्नाची उत्सुकता निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षी गुढीपाढव्याच्या शुभमुहूर्तावर ९ एप्रिल २०२४ या दिवशी शिवानी सोनार आणि अंबर गणपुळेचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होऊ लागली. अगदी काही महिन्यांपूर्वीच दोघांनीही मोठ्या दणक्यात त्यांची बॅचलर पार्टी साजरी केली. आता लवकर शिवानी-अंबर लग्नबेडीत अडकणार आहेत.