रेवती लेले पाठोपाठ टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रीची लगीनघाई! थाटात पार पडला मेहंदी सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 17:01 IST2026-02-18T16:57:58+5:302026-02-18T17:01:45+5:30
मेहंदी रंगली गं...! टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री लवकरच करणार लग्न;'या'मालिकेत केलंय काम

रेवती लेले पाठोपाठ टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रीची लगीनघाई! थाटात पार पडला मेहंदी सोहळा
Television Actress: मराठी कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. नुकतंच साक्षी महाजन-अथर्व कर्वे तसेच विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर या कलाकारांनी लग्नगाठ बांधत नव्या प्रवासाला सुरुवात केली. आता आणखी एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेत्रीच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून तिचा मेहेंदी सोहळा नुकताच पार पडला आहे. याचे फोटो अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

सन मराठी वाहिनीवरील 'मुलगी पसंत आहे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कल्याणी टिभे लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. सध्या कल्याणीच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरु झाली असून नुकताच तिचा मेहंदी सोहळा पार पडला आहे. आता लवकरच ही नायिका लग्न करणार आहे. अभिनेत्री कल्याणी टिभेच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव राजन आहे. लवकरच हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहे.
दरम्यान,मेहंदी सोहळ्यासाठी कल्याणीने खास लूक केला होता. हातावर खास मोर असलेली डिझाइन मेहेंदीतून काढल्याचं दिसत आहे. कल्याणी टिभेचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांसह सेलिब्रिटींनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.