Good News...! 'कमळी' मालिकेतील अभिनेत्री झाली आई; घरी छोट्या परीचं आगमन, खास पोस्ट शेअर करत म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 10:54 IST2026-03-25T10:52:04+5:302026-03-25T10:54:16+5:30
मुलगी झाली हो! 'कमळी' मालिकेतील अभिनेत्री झाली आई, घरी आली चिमुकली पाहुणी घरी आली चिमुकली पाहुणी

Good News...! 'कमळी' मालिकेतील अभिनेत्री झाली आई; घरी छोट्या परीचं आगमन, खास पोस्ट शेअर करत म्हणते...
Sai Kalyankar Blessed With Baby Girl: छोट्या पडद्यावरील कमळी ही अतिशय लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या मालिकेचं कथानक प्रेक्षकांना आवडतंय त्याशिवाय त्यातील कलाकार देखील त्यांना आपलेसे वाटू लागले आहेत. दरम्यान, या मालिकेमध्ये राधिका नावाची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री सई कल्याणकरने नुकतीच गोड बातमी दिली आहे.'कमळी' मधील राधिका आता खऱ्या आयुष्यात आई झाली आहे.
अभिनेत्री सई कल्याणकरच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. काही महिन्यापूर्वी सईने खास डोहाळजेवणाचं फोटोशूट करत चाहत्यांना गोड बातमी दिली होती. त्यावर चाहत्यांनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आता अखेर तिची प्रतीक्षा संपली आहे. तिला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे.तिने एक खास पोस्ट करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. तिने या पोस्टमध्ये चिमुकलीचा हात दाखवला आहे. तिच्यावर आता चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. १० मार्च २०२६ रोजी सईच्या लेकीचा जन्म झाला. त्यानंतर १४ दिवसांनी ही आनंदाची बातमी चाहत्यासोबत शेअर केली आहे.
आमच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. १० मार्चला आम्हाला मुलगी झाली. आता एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. अशा आशयाची पोस्ट अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
वर्कफ्रंट
अभिनेत्री सई कल्याणकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने 'दख्खनचा राजा ज्योतिबा', 'ठिपक्यांची रांगोळी या मालिकांमधून तिने अभिनय केला आहे.सईने २०२१ मध्ये शिवराम चव्हाण यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्याचबरोबर तिने अनेक चित्रपटांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.आता लग्नाच्या चार वर्षानंतर अभिनेत्रीच्या घरी पाळणा हळला आहे.