VIDEO: 'आई कुठे....' फेम अश्विनी महांगडे पोहोचली खंडेरायाच्या दर्शनाला, सोबतीला दिसली 'ही' अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 10:03 IST2025-03-15T10:01:25+5:302025-03-15T10:03:47+5:30
अभिनेत्री अश्विनी महांगडेने नुकत्याच सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ती चर्चेत आली आहे.

VIDEO: 'आई कुठे....' फेम अश्विनी महांगडे पोहोचली खंडेरायाच्या दर्शनाला, सोबतीला दिसली 'ही' अभिनेत्री
Ashwini Mahangade: सध्याच्या घडीला सोशल मीडिया हे माध्यम प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चाललं आहे. सर्वसामान्यांसह कलाकार मंडळी सुद्धा या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाच्या अपडेट्स ते यामार्फत चाहत्यांना देत असतात. अशातच 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashwini Mahangade) नुकत्याच सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ती चर्चेत आली आहे. अश्विनी महागंडे कायम चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या ती संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. सध्या तिने इनस्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
नुकतंच अश्विनी महांगडेनं साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या व श्रद्धास्थान असलेल्या जेजेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन घेतलं. जेजुरी गडावरील दर्शनाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. होळीच्या निमित्ताने अभिनेत्री जेजुरी गडावर पोहोचली. या व्हिडीओमध्ये अश्विनीसोबत 'आई कुठे काय करते' मालिकेतील सहकलाकार कौमुदी वलोवरसुद्धा पाहायला मिळते आहे. दरम्यान, आपल्या अधिकृत इनस्टाग्राम अकाउंटवर अश्विनीने देवदर्शनाचा हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, "रंग…, दिवसातला शेवटचा फोटो काढायचा हे कारण देवून #हॅप्पी होळी आणि तिही एवढ्या चांगल्या रंगाने (भंडारा) केल्याबद्दल कौमुदे वलोकर यांचे आभार... अश्विनी महांगडेच्या या पोस्टवर चाहत्यांसह मराठी कलाकारांसह चाहत्यांनी भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, अश्विनी महांगडे आणि कौमुदी वलोकर यांनी 'आई कुठे काय करते' मालिकेत एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. या मालिकेमध्ये अश्विनीने अनघा हे पात्र साकारलं. तर कौमुदी वलोकर अरुंधतीचा मुलगा म्हणजेच यशची पत्नी आरोहीच्या भूमिकेत पाहायला मिळाली