लोकप्रिय मालिकेचा अभिनेता अडकणार लग्नबंधनात! थाटात पार पडला मेहंदी सोहळा, होणारी पत्नी आहे सौंदर्यवती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 08:54 IST2026-01-22T08:52:11+5:302026-01-22T08:54:21+5:30

लग्नघटिका समीप आली! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता लवकरच बांधणार लग्नगाठ, कोण आहे होणारी पत्नी?

marathi television actor siddharth khirid mehendi ceremony will tie knot on 23 january | लोकप्रिय मालिकेचा अभिनेता अडकणार लग्नबंधनात! थाटात पार पडला मेहंदी सोहळा, होणारी पत्नी आहे सौंदर्यवती

लोकप्रिय मालिकेचा अभिनेता अडकणार लग्नबंधनात! थाटात पार पडला मेहंदी सोहळा, होणारी पत्नी आहे सौंदर्यवती

Siddharth Khirid Wedding: 'फ्रेशर्स',' मुलगी झाली हो', 'राणी मी होणार' यांसारख्या मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे सिद्धार्थ खिरीड. आपल्या सहज सुंदर अभिनयाने सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.  सध्या अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अगदी काही महिन्यांपूर्वीच सिद्धार्थने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची  कबुली दिली होती, इतकंच नाही तर गर्लफ्रेंडला गोव्याच्या समुद्रकिनारी फिल्मी स्टाईलने प्रपोज केलं होतं. यानंतर सिद्धार्थ कधी लग्न करणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात होती. अखेर आता याची लग्नघटिका समीप आली आहे. 


दरम्यान, येत्या काही दिवसांत मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार  हे लग्नबंधनात अडकणार आहेत. कालच   अशोक.मा. मा फेम अभिनेत्री रसिका वाखारकरने शुभांकपर उंब्रानी यांचा लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर यापाठोपाठ आता सिद्धार्थ खिरीडच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे. सिद्धार्थची होणाऱ्या पत्नीचं नाव डॉ. मैथिली भोसेकर आहे.नुकताच सिद्धार्थ-मैथिलीचा मेहंदी सोहळा पार पडला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याने त्यांच्या मेहंदी सोहळ्याचे सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 

मैथिलीच्या हातावर आता सिद्धार्थच्या नावाची मेहंदी सजली आहे. मैथिली कॅनडात राहते. शिवाय मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट-२०२२-२३ चा खिताब तिने पटकवला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखतात. सिद्धार्थ आणि मैथिलीचा  मेहंदी सोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे. अगदी काल-परवाच सिद्धार्थने सोशल मीडियावर हटके पोस्ट शेअर करत तो विवाहबंधनात अडकणार असल्याचं जाहिर केलं होतं. आता प्री-वेडिंग फोटोशूट,मेहंदी सोहळा पार पडल्यावर लवकरच तो लग्नबंधनात अडकणार आहे. 

दरम्यान, सिद्धार्थ खिरिडच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा मालिकेत काम करताना दिसतो आहे. 

Web Title : लोकप्रिय टीवी अभिनेता सिद्धार्थ खिरीड जल्द ही शादी के बंधन में बंधेंगे!

Web Summary : सिद्धार्थ खिरीड, 'फ्रेशर्स' और 'मुलगी झाली हो' में अपनी भूमिकाओं के लिए प्रसिद्ध, जल्द ही शादी करने जा रहे हैं। उन्होंने हाल ही में अपनी सगाई की घोषणा की और कनाडा की सौंदर्य प्रतियोगिता विजेता डॉ. मैथिली भोसकर के साथ अपनी मेहंदी की रस्म मनाई। शादी की शहनाई बजने वाली है!

Web Title : Popular TV Actor Siddharth Khirid to Tie the Knot Soon!

Web Summary : Siddharth Khirid, famed for roles in 'Freshers' and 'Mulgi Jhali Ho,' is getting married. He recently announced his engagement and celebrated his Mehndi ceremony with Dr. Maithili Bhosekar, a beauty pageant winner from Canada. Wedding bells are ringing!