'शुभविवाह' मालिकेत नव्या कलाकाराची एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणतो- "तुम्हाला भेटायला येतोय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 12:05 IST2024-11-13T12:02:31+5:302024-11-13T12:05:34+5:30

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेत नव्या कलाकाराची एन्ट्री होणार आहे.

marathi television actor shreyas raje entry in star pravah shubh vivah serial post viral on social media | 'शुभविवाह' मालिकेत नव्या कलाकाराची एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणतो- "तुम्हाला भेटायला येतोय..."

'शुभविवाह' मालिकेत नव्या कलाकाराची एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणतो- "तुम्हाला भेटायला येतोय..."

Shreyas Raje: टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्याकडून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांकडे प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचं चित्र आहे. दरम्यान, आता स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'शुभविवाह'  मध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत लवकरच नवीन कलाकाराची एन्ट्री होणार आहे.


'शुभविवाह' मालिकेने अल्पवाधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ही मालिका दुपारच्या वेळेत प्रक्षेपित होऊनही टीआरपीच्या यादीत पहिल्या १० मालिकांमध्ये असते. अभिनेत्री मधुरा देशपांडे, यशोमन आपटे तसेच विशाखा सुभेदार, कुंजिका काळवींट यांसारख्या कलाकारांची फौज पाहायला मिळते आहे. आता मालिकेत नव्या सदस्याची एन्ट्री होणार आहे. अभिनेता श्रेयस राजे या मालिकेत काम करताना दिसणार आहे. श्रेयसने सोशल मीडियावर खास पोस्ट करत याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. 

श्रेयसने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहलंय, "पारितोष अवस्थी तुम्हाला भेटायला येतोय. आजपासून ‘शुभविवाह’ हया मालिकेत. पाहायला विसरू नका सोमवार ते शनिवार दुपारी २ वाजता. फक्त आपल्या लाडक्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर". अभिनेत्याच्या या पोस्टवर यशोमन आपटे तसेच निखिल बने यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय श्रेयसची पोस्ट पाहून त्याते चाहते देखील उत्सुक आहेत. 

Web Title: marathi television actor shreyas raje entry in star pravah shubh vivah serial post viral on social media