"पोलिसांवर पूर्ण विश्वास, पण...", महिन्याभरापूर्वी चोरीला गेलेल्या फोनबद्दल अभिनेता संकेत कोर्लेकरने दिली महत्वाची अपडेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 16:52 IST2025-03-29T16:50:35+5:302025-03-29T16:52:28+5:30

अभिनेता संकेत कोर्लेकर हा मराठी कालाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे.

marathi television actor sanket korlekar gives an important update about the phone stolen a month ago shared post | "पोलिसांवर पूर्ण विश्वास, पण...", महिन्याभरापूर्वी चोरीला गेलेल्या फोनबद्दल अभिनेता संकेत कोर्लेकरने दिली महत्वाची अपडेट 

"पोलिसांवर पूर्ण विश्वास, पण...", महिन्याभरापूर्वी चोरीला गेलेल्या फोनबद्दल अभिनेता संकेत कोर्लेकरने दिली महत्वाची अपडेट 

Sanket Korlekar: 'अजूनही बरसात आहे','लेक माझी दुर्गा' तसंच 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांसारख्या मालिकांमुळे अभिनेता संकेत कोर्लेकर प्रसिद्धीझोतात आला. संकेत कोर्लेकर (Sanket Korlekar) हा उत्तम अभिनेता असण्यासोबत तो युट्यूबर आहे. अभिनेता मागील काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. अलिकडेच चालत्या गाडीतून त्याचा महागडा मोबाईल चोरीला गेल्याची माहिती समोर आली होती. फोन चोरीला गेल्यानंतर अभिनेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संकेतने याबद्दल स्वत: चाहत्यांना माहिती दिली. त्यात आता अभिनेत्याने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. 

नुकतीच संकेत कोर्लेकरने त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर चोरी झालेल्या फोनबद्दल महत्वाची अपडेट दिली आहे. त्यामध्ये अभिनेत्याने लिहिलंय, "जेव्हा तुम्हाला समोर दिसतंय मोबाईल चोर भिवंडीत आहे पण दोन आठवडे झाले तरी फोन तुमच्या हातात नाही. ही भावना खूप त्रास देते. मला पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. ते गुन्हेगार शोधणार. माझ्या मोबाईलसहीत अजून बऱ्याच जणांचे मोबाईल मिळू दे आणि ती इतक्या वर्ष मोकाट चोरीमारी करणारी टोळी मुळातून नष्ट होऊदे हीच प्रार्थना..."

चाहत्यांना केलं आवाहन 

त्यानंतर पुढे अभिनेत्याने लिहिलंय, "दोन लाखाचा फक्त एक महिना वापरलेला फोन अचानक दुसरा हिसकावून घेऊन जातो पाहून वाईट काय? काळजी घ्या.. जग बदलत चाललंय."अशी पोस्ट शेअर करत त्याने अनेक चाहत्यांनाही अशा प्रकारांबद्दल सावधान व सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे

 

Web Title: marathi television actor sanket korlekar gives an important update about the phone stolen a month ago shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.