सन मराठीवरील 'या' लोकप्रिय मालिकेत अभिनेता अंबर गणपुळेची एन्ट्री, प्रेक्षक उत्सुक; पाहा प्रोमो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:46 IST2025-02-27T13:44:58+5:302025-02-27T13:46:48+5:30
छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा फार मोठा आहे.

सन मराठीवरील 'या' लोकप्रिय मालिकेत अभिनेता अंबर गणपुळेची एन्ट्री, प्रेक्षक उत्सुक; पाहा प्रोमो
Navi Janmen Mi: छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा फार मोठा आहे. त्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी तसेच मालिकांचा टीआरपी वाढण्यासाठी वाहिन्यांकडून वेगवेगळे प्रयोग केले जातात. कधी मालिकेत नवीन पात्राची एन्ट्री करुन कथानक आणखी रंजक केलं जातं. अशातच सन मराठी वाहिनीवरील 'नवी जन्मेन मी' या मालिकेची सध्या चर्चा होताना दिसते. दरम्यान, या मालिकेत जिद्दी, सर्वांच्या मनाचा अचूक ठाव घेणा-या स्वानंदी मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. अशातच या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. हा अभिनेता म्हणजे अंबर गणपुळे आहे.
सन मराठी वाहिनीच्या नवी जन्मेन मी मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेत अभिनेता मणीराज पवार, रोहन गुजर तसेच शिल्पा ठाकरे आणि साक्षी गांधी यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. साधारण २०२३ पासून या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. अगदी अल्पावधीत मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सध्या मालिकेमध्ये सरपोतदार साहेबांनी आपला मुलगा सुजितसह त्याची पत्नी संचिता आणि बायको शालिनी यांना घराबाहेर काढल्याचा सिक्वेंस दाखवण्यात आला आहे. त्यात आता या मालिकेमध्ये अभिनेता अंबर गणपुळेची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये पुन्हा अभिनेत्याला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
अंबर गणपुळे हा 'रंग माझा वेगळा' या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आला. मराठी मालिकांशिवाय अभिनेत्याने चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं आहे. शिवाय अलिकडेच तो कलर्स मराठीच्या 'दुर्गा' मालिकेत झळकला. त्यानंतर एका वेगळ्यात भूमिकेतून अभिनेता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. दरम्यान, नवी जन्मेन ही सन मराठी वाहिनीवर दररोज 7:30 वाजता प्रसारित केली जाते.