साजिरीला मिळणार तिचा आवाज; शौनक पूर्ण करणार विलासचं स्वप्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 17:46 IST2021-11-07T17:46:00+5:302021-11-07T17:46:00+5:30
Mulgi zali ho: स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रोहन, शौनक आणि साजिरीला पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला देतो. परंतु, शौनक हे मान्य करत नाही. त्याऐवजी मी साजिरीचा आवाज तिला परत मिळवून देईन असं म्हणतो.

साजिरीला मिळणार तिचा आवाज; शौनक पूर्ण करणार विलासचं स्वप्न
छोट्या पडद्यावरील 'मुलगी झाल हो' ( mulgi zali ho) या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस या मालिकेत येणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांच्या नजरा या मालिकेला खिळून बसल्या आहेत. दमदार कथानक आणि कलाकारांचा उत्तम अभिनय यामुळे ही मालिका सध्या लोकप्रिय होत आहे. त्यातच विलास आणि साजिरी या बापलेकीची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडत आहे. आपल्या मुलीचा आवाज परत यावा यासाठी विलास कसोशीने प्रयत्न करत आहे. परंतु, आता त्याचं हे स्वप्न शौनक पूर्ण करणार आहे.
स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रोहन, शौनक आणि साजिरीला पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला देतो. परंतु, शौनक हे मान्य करत नाही. त्याऐवजी मी साजिरीचा आवाज तिला परत मिळवून देईन असं म्हणतो.
'तुम्ही दोघं पळून जाऊन लग्न करा. मी मदत करतो तुम्हाला', असं रोहन म्हणतो. त्यावर, 'अरे, थोरामोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय लग्न करायला काय अर्थ आहे? उलट विलास काकांचं स्वप्न मी पूर्ण करणार. साजिरीला तिचा आवाज परत मिळवून देणार', असं शौनक म्हणतो.
दरम्यान, आता या मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शौनक आणि साजिरीचं लग्न होणार की नाही? साजिरीला तिचा आवाज परत मिळणार का? यासाठी शौनकला आता पुढे कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.