आधी घर अन् आता नवी गाडी! मराठी सेलिब्रिटी जोडप्याच्या आयुष्यात दुहेरी आनंद; दोघे 'या' लोकप्रिय मालिकांमध्ये करतात काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 09:58 IST2025-11-06T09:54:03+5:302025-11-06T09:58:53+5:30
आधी घर अन् आता...! सेलिब्रिटी जोडप्याच्या घरी आली नवी पाहूणी, पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

आधी घर अन् आता नवी गाडी! मराठी सेलिब्रिटी जोडप्याच्या आयुष्यात दुहेरी आनंद; दोघे 'या' लोकप्रिय मालिकांमध्ये करतात काम
Madhura Joshi and Guru Divekar: आपलं हक्काचं घर आणि फिरायला हक्काची गाडी असावी हे सर्वसामान्यासह प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी प्रत्येकजण जीवापाड मेहनत घेत असतो. दिवाळीच्या मुहूर्तावर यंदा अनेक मराठी कलाकारांनी नवीन घर, नवीन गाडी खरेदी केल्याचं पाहायला मिळालं.अलिकडेच अभिनेता मंदार जाधवच्या घरी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त घरी नव्या गाडीचं आगमन झालं. त्यापाठोपाठ आता मराठीतील एका सेलिब्रिटी जोडप्याने नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. ही जोडी कोण आहे पाहूयात...
विविध मराठी मालिकांधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मधुरा जोशी आणि पती गुरु दिवेकर यांनी मिळून आधी स्वत:चं घर घेतलं होतं. त्यानंतर या जोडप्याने आता नवीन गाडी खरेदी केली आहे.नुकतीच सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांनी नव्या गाडीची झलक चाहत्यांना दाखवली आहे. नव्या गाडीचे फोटो शेअर करत मधुरा-गुरुने या फोटोंना , गणपती बाप्पा मोरया... अखेर नवी गाडी घरी आली. असं म्हणतात,पहिलं कायम खूप खास असतं.आमची एकत्र पहिली कार...", असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. मधुरा-गुरुने Maruti Suzuki Fronx ब्रॅंडची ही गाडी घेतली आहे.दरम्यान, रुपल नंद ,सुकन्या मोने कोमल कुंभार, मंजुषा गोडसे आणि माधवी निमकर या कलाकारांनी आणि चाहत्यांनी या जोडप्यावर नव्या गाडीसाठी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
वर्कफ्रंट
मधुरा जोशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने फुलाला सुगंध मातीचा मालिकेत इमिली नावाचं पात्र साकारुन घराघरात पोहोचली. त्यानंतर आता ती तू ही रे माझा मितवा मालिकेत काम करताना दिसते आहे. तर गुरु दिवेकर सावळ्याची जणू सावली मालिकेत सोहम ही व्यक्तिरेखा साकारतो आहे.दरम्यान,गुरु आणि मधूरा यांची पहिली भेट एका मालिकेच्या सेटवर झाली. त्याचदरम्यान, त्यांच्याच मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.