Video : स्वीटू अन् परीचा सेटवरील 'हा' क्युट डान्स पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 19:32 IST2021-10-08T19:31:34+5:302021-10-08T19:32:36+5:30

Anvita phaltankar and myra vaikul dance: 'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.

marathi celebrity anvita phaltankar and myra vaikul dance video viral | Video : स्वीटू अन् परीचा सेटवरील 'हा' क्युट डान्स पाहिलात का?

Video : स्वीटू अन् परीचा सेटवरील 'हा' क्युट डान्स पाहिलात का?

ठळक मुद्देझी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर स्वीटू आणि परीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स. दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटात पार पडतो. यावेळीदेखील या सोहळ्याचं असंच आयोजन करण्यात आलं असून सगळी कलाकार मंडळी या सोहळ्याच्या तयारीला लागली आहेत. याच सोहळ्याच्या निमित्ताने 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधल्या स्वीटूची आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'मधल्या परीची सेटवर भेट झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे पहिल्याच भेटीत या दोघींची छान गट्टी जमली असून त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर स्वीटू आणि परीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये या दोघी जणी 'छोटीसी, प्यारीसी..आयी कोई परी' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या दोघींचा हा क्यूट व्हिडीओ बघता बघता वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून तो तुफान लोकप्रिय होत आहे.

दरम्यान, यावर्षी 'नव्या नात्यांच्या बंधू गाठी' म्हणत झी मराठीच्या परिवारात अनेक नवीन मालिका आणि कलाकारांचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे यातील अनेक मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाल्या आहेत. यामध्येच 'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळेच या मालिकेतील कोणत्या कलाकाराला झी मराठी पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Web Title: marathi celebrity anvita phaltankar and myra vaikul dance video viral