पुन्हा एकदा एक्स्प्रेशन्समुळे विशाखाने जिंकली चाहत्यांची मनं; 'रंग लगे या इश्क दा'वर केला डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 16:12 IST2023-12-28T16:11:13+5:302023-12-28T16:12:08+5:30
Vishakha subhedar: विशाखा कायम ट्रेंडिंग गाण्यावर व्हिडीओ शेअर करत असते.

पुन्हा एकदा एक्स्प्रेशन्समुळे विशाखाने जिंकली चाहत्यांची मनं; 'रंग लगे या इश्क दा'वर केला डान्स
छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा(Maharashtrachi Hasyajatra) या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार(vishakha subhedar). आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी विशाखा अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगना सुद्धा आहे. त्यामुळे ती कायम सोशल मीडियावर तिच्या डान्सचे काही व्हिडीओ शेअर करत असते.
विशाखा कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे कोणताही नवा ट्रेंड आला की ती तो फॉलो करते. इतकंच नाही तर तिला डान्सची विशेष आवड असून ती बऱ्याचदा तिच्या डान्सचे व्हिडीओही नेटकऱ्यांसोबत शेअर करते. यावेळी सुद्धा तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने कमालीचे एक्स्प्रेशन्स दिले आहेत.
विशाखाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने मोहीत चौहान याच्या 'रंग लगेया इश्क दा' या गाण्यावर भन्नाट एक्स्प्रेशन्स दिले आहेत. तिच्या या व्हिडीओवर नेटकरी कमालीच्या कमेंट करत आहेत.
दरम्यान, विशाखाला नृत्याची विशेष आवड असून ती कायम तिच्या डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. विशाखा मराठी कलाविश्वात चांगलीच सक्रीय आहे. तिने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या शोसोबतच काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. यात ‘फक्त लढ म्हणा’ , ‘४ इडियट्स,‘अरे आवाज कोनाचा’ ,‘ये रे ये रे पैसा’आणि ६६ सदाशिव या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.