'तुझा मेंदू गुडघ्यात आहे'; लग्नानंतर वनिता खरातने घेतली नवऱ्याची फिरकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 17:49 IST2023-04-26T17:46:43+5:302023-04-26T17:49:34+5:30
Vanita kharat: लग्नानंतर वनिताने नवऱ्यासोबत अनेक भन्नाट रिल्स शेअर केले आहेत.

'तुझा मेंदू गुडघ्यात आहे'; लग्नानंतर वनिता खरातने घेतली नवऱ्याची फिरकी
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री, विनोदवीर म्हणजे वनिता खरात (Vanita Kharat). काही महिन्यांपूर्वीच वनिताने प्रियकर सुमित लोंढेसोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून ती सातत्याने चर्तेत येत आहे. विशेष म्हणजे वनिता आता तिच्या नवऱ्यासोबत काही भन्नाट व्हिडीओ, रिल्स करत असून ते चाहत्यांसोबत शेअरदेखील करते. यात अलिकडेच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने चक्क नवऱ्याची खिल्ली उडवली आहे.
अलिकडेच वनिताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आणि सुमित एक भन्नाट रिल कॉपी करत आहेत. यात 'तुला एक सांगितलं तर वाईट वाटणार नाही ना?' असा प्रश्न वनिता सुमितला विचारते. त्यावर तो नाही म्हणतो, सुमितचं नाही असं उत्तर ऐकताच 'तू एक नंबरचा गाढव आहेस, आणि तुझा मेंदू गुडघ्यात आहे', असं ती म्हणते. त्यावर सुमितही तिला सेम प्रश्न विचारतो. मात्र, 'मला वाईट वाटतं' असं म्हणत वनिता सुमितच्या प्रश्नाचं उत्तरं देण्याचं टाळते.
दरम्यान, वनिता खरात मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या वनिताने न्यूड फोटोशूट करुन खळबळ माजवली होती. तिचं फोटोशूट प्रचंड चर्चेत आलं होतं.