"एकाच वेळी दोन मुलांवर प्रेम...", वैदेही परशुरामीचं रिलेशनशीपसंदर्भातील वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:56 IST2025-02-21T13:56:11+5:302025-02-21T13:56:59+5:30
वैदेही प्रेमावर नक्की काय म्हणाली?

"एकाच वेळी दोन मुलांवर प्रेम...", वैदेही परशुरामीचं रिलेशनशीपसंदर्भातील वक्तव्य चर्चेत
मराठमोळी अभिनेत्री वैदेही परशुरामीचे (Vaidehi Parshurami) अनेक चाहते आहेत. तिला मराठीतली कतरिना कैफही असंही म्हटलं गेलं. वैदेही तिच्या सौंदर्यामुळे अनेकांना प्रेमात पाडते. नुकत्याच रिलीज झालेल्या 'संगीत मानापमान' मधील भूमिकेसाठीही तिचं कौतुक झालं. वैदेही '...आणि डॉ काशिनाथ घाणेकर' सिनेमातून लोकप्रिय झाली. 'संगीत मानापमान' वेळी वैदेहीने मुलाखत दिली तेव्हा तिने प्रेमावर एक वक्तव्य केलं जे आता व्हायरल होत आहे.
वैदेही परशुरामी आपल्या गोड दिसण्याने, हसण्याने सर्वांना प्रेमात पाडते. ती उत्तम नृत्यही करते. द ऑड इंजिनिअरला दिलेल्या मुलाखतीत वैदेहीला प्रश्न विचारण्यात आला की एकाच वेळी दोन जणांवर प्रेम होतं का? यावर ती म्हणाली, "ही खूप गुंतागुंतीची भावना आहे. आपण आई आणि वडिलांवर एकावेळेला प्रेम करतोच की. आईवर आत्ता प्रेम आहे म्हणून बाबांवर नाही असं होत नाही. त्यामुळे आपण सामान्यत: अर्थाच एका वेळेला दोन, तीन, चार माणसांवर प्रेम करतच असतो. पण त्या प्रेमाची तीव्रता काय आहे हे ती व्यक्ती कोण आहे त्यावर ठरत असतं. एका वेळेस दोन मुलांवर प्रेम करावं की नाही हा मुद्दा नाही तर ते करणं जमेल का? हा प्रश्न आहे. प्रेम करणं जमेल का? बॉयफ्रेंड असणं हा मुद्दा नाही तर त्या दोघांवर एका वेळेला एक सारखं प्रेम करणं जमेल का?"
या व्हिडिओवर काही नेटकऱ्यांनी मात्र कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. 'प्रेमाचा बाजार करुन ठेवलाय आजकाल सर्वांनी, आईवडिलांशी तुलना करु नका','लग्न करताना कोणासोबत करायचं ते पण सांग','तू कोणत्या प्रेमाबद्दल बोलत आहेस, बॉयफ्रेंड की नातेवाईक?' अशा प्रकारच्या कमेंट्स यावर आल्या आहेत. वैदेही परशुरामी आणि सुबोध भावेचा 'संगीत मानापमान' मराठी सिनेमा चांगला चालला. आता व