'ठरलं तर मग' मधील 'प्रतिमा' आत्यांच्या घरात आली नवी पाहुणी! पहिल्यांदाच संपूर्ण कुटुंबासोबत शेअर केला VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 15:24 IST2025-11-06T15:20:02+5:302025-11-06T15:24:03+5:30
'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने चाहत्यांना दिली गुडन्यूज, शेअर केला व्हिडीओ

'ठरलं तर मग' मधील 'प्रतिमा' आत्यांच्या घरात आली नवी पाहुणी! पहिल्यांदाच संपूर्ण कुटुंबासोबत शेअर केला VIDEO
Tharla Tar Mag Actress Shilpa Navalkar: छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची आवडती असणारी मालिका म्हणजे ठरलं तर मग. या मालिकेचं कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळेच मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो.दरम्यान, या मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकार देखील सातत्याने चर्चेत येत असतात. अशातच मालिकेत प्रतिमा आत्यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी नुकतीच चाहत्यांना एक गुडन्यज दिली आहे.

शिल्पा नवलकर या उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच त्या या मालिकेच्या संवाद लेखिका देखील आहेत.नुकतीच शिल्पा नवलकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर खास स्टोरी शेअर केली आहे. त्याद्वारे त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिलाय.शिल्पा नवलकर यांनी नुकतीच नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. पती ऋषी देशपांडे आणि आपल्या लेकीसह त्या गाडी खरेदी करण्यासाठी पोहोचल्या आहेत.या व्हिडीओमध्ये शिल्पा आणि त्यांचे पती ऋषी दोघेीही या गाडीची पूजा करताना दिसत आहेत. नवीन कार खरेदी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच त्यांच्यावर चाहत्यांनीच नाहीतर सेलिब्रिटींनीही अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

शिल्पा नवलकर गेली कित्येक वर्ष सिनेसृष्टीत काम करत आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या सध्या 'ठरलं तर मग' मालिकेत अर्जूनची आत्या म्हणजेच प्रतिमाच्या भूमिकेत दिसत आहेत. या भूमिकेने त्यांना पुन्हा एकदा मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे.