तेजश्रीचा मनमौजी अंदाज; निसर्गाच्या सानिध्यात व्हेकेशन करतीये एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 15:13 IST2024-06-25T15:13:22+5:302024-06-25T15:13:45+5:30
Tejashree pradhan: तेजश्री सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. मात्र, रोजच्या बिझी शेड्युलमधून थोडासा वेळ काढत तेजश्री तिचं व्हेकेशन एन्जॉय करतीये.

तेजश्रीचा मनमौजी अंदाज; निसर्गाच्या सानिध्यात व्हेकेशन करतीये एन्जॉय
'होणार सून मी या घरची' या गाजलेल्या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर तेजश्रीने अल्पावधीत इंडस्ट्रीत तिची जागा निर्माण केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते. सध्या तेजश्री तिच्या व्हेकेशनमुळे चर्चेत येत आहे.
तेजश्री सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. मात्र, रोजच्या बिझी शेड्युलमधून थोडासा वेळ काढत तेजश्री तिचं व्हेकेशन एन्जॉय करतीये. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या तेजश्रीने तिचे काही फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. यातून ती सध्या निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत असल्याचं दिसून येत आहे.
तेजश्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत हॅप्पी लाइफ असं कॅप्शन दिलं आहे. सोबतच बॉलिवूड साँगही बॅकग्राऊंडला प्ले केलं आहे. तेजश्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिचा मनमौजी अंदाज नेटकऱ्यांना आवडला आहे.
दरम्यान, तेजश्री सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुख्य़ भूमिका साकारत आहे. यापूर्वी ती शर्यत, लग्न पाहावे करुण, डॉ प्रकाश बाबा आमटे, जजमेंट, ती सध्या काय करते यांसारख्या सिनेमात झळकली आहे. तर, सूर नवा ध्यास नवा, अग्गबाई सासूबाई, होणार सून मी या घरची यांसारख्या कितीतरी मालिकांमध्ये काम केलं आहे.