अभिनेत्री शिवानी सोनार अन् अंबर गणपुळे अडकले लग्नबंधनात, फोटो आले समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:11 IST2025-01-21T12:10:03+5:302025-01-21T12:11:59+5:30

मागील काही दिवसांपासून मराठी कलाविश्वात अभिनेत्री शिवानी सोनार आणि अंबर गणपुळेच्या लग्नाची जोरादार चर्चा सुरु होती.

marathi actress shivani sonar wedding tie knot with ambar ganpule photo viral on social media | अभिनेत्री शिवानी सोनार अन् अंबर गणपुळे अडकले लग्नबंधनात, फोटो आले समोर 

अभिनेत्री शिवानी सोनार अन् अंबर गणपुळे अडकले लग्नबंधनात, फोटो आले समोर 

Shivani Sonar Wedding : मागील काही दिवसांपासून मराठी कलाविश्वात अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) आणि अंबर गणपुळेच्या (Ambar Ganpule) लग्नाची जोरादार चर्चा सुरु होती. त्यांच्या लग्नाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज (२१ जानेवारी २०२५) या दिवशी अंबर-शिवानी लग्नबंधनात अडकले आहेत. आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाला त्यांनी सुरुवात केली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

गेल्या वर्षी गुढीपाढव्याच्या शुभमुहूर्तावर ९ एप्रिल २०२४ या दिवशी शिवानी सोनार आणि अंबर गणपुळेचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होऊ लागली. अगदी काही महिन्यांपूर्वीच दोघांनीही मोठ्या दणक्यात त्यांची बॅचलर पार्टी साजरी केली. अखेर तो क्षण आता आलेला आहे. शिवानी आणि अंबर यांचा लग्नसोहळा थाटामाटात पडला आहे. आपल्या लग्नासाठी दोघांहीनी सुंदर अशी वेशभूषा केली आहे. शिवानीने हिरव्या रंगाची साडी आणि अंबरने ऑफ व्हाइट रंगाचा सदरा आणि त्यावर गुलाबी रंगाचा शेला घेऊन लग्नात खास लूक केला आहे. या नवोदित जोडप्यावर मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

वर्कफ्रंट 

शिवानी सोनारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, 'राजा राणीची गं जोडी'  'तू भेटशी नव्याने' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर अंबर गणपुळे स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आला होता. 

Web Title: marathi actress shivani sonar wedding tie knot with ambar ganpule photo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.