'माझा अपमान कमी कर'; साक्षी गांधीची 'सहकुटुंब सहपरिवार'फेम अभिनेत्यासाठी पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 17:37 IST2023-12-12T17:36:40+5:302023-12-12T17:37:01+5:30
Sakshee gandhi: साक्षीने या पोस्टला दिलेलं कॅप्शन जास्त चर्चेत येत आहे.

'माझा अपमान कमी कर'; साक्षी गांधीची 'सहकुटुंब सहपरिवार'फेम अभिनेत्यासाठी पोस्ट
'सहकुटुंब सहपरिवार' ( sahakutumb sahaparivar) या गाजलेल्या मालिकेतून अनेक कलाकार नावारुपाला आले. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे साक्षी गांधी (sakshee gandhi). या मालिकेत अवनी ही भूमिका साकारुन साक्षी विशेष लोकप्रिय झाली. या मालिकेतील प्रत्येक कलाकारासोबत साक्षीचं उत्तम बॉण्डिंग झालं आहे. त्यामुळे अनेकदा ती सोशल मीडियावर मालिकेतील कलाकारांसोबतचे काही किस्से, फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यामध्येच तिने या मालिकेतील अभिनेत्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
साक्षीने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. साक्षीने ही पोस्ट अभिनेता अमेय बर्वेसाठी लिहिली आहे. सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत अमेयने वैभव ही भूमिका साकारली होती. त्यामुळे या दोघांमध्ये छान मैत्री आहे. त्यामुळेच त्याच्यासाठी साक्षीने ही पोस्ट लिहिली आहे. सोबतच त्यांचे एकत्र काही फोटोही पोस्ट केले आहेत.
"तुझं ज्ञान, तुझी बुद्धी, तुझी हुशारी, तुझा स्मार्टनेस …यापलीकडे तुझी मस्ती, तुझे किस्से, तुझा कधीकधी डोकावणारा अल्लडपणा, तुझं उगीच रागावणं, तुझा sarcasm हे सगळं असंच राहूदेत …माणसाने आयुष्यात बदलावं स्वतःला असं म्हणतात .. पण तू आहेस असाच रहा.. आम्हाला तू असाच आवडतोस .. माणसं जपत रहा.. प्रेम करत रहा..तुझ्या कामाच्या आम्ही सगळे प्रेमात आहोतच .. यापुढे सुद्धा तुला उत्तमोत्तम कामं मिळू देत आणि ती कामं तू छान करशीलच. बाकी माझावर सोड .. मी तुला gossips सांगत राहीनच (टिप : जमलं तर माझा अपमान कमी कर .. आणि माझाशी जरा चांगल वाग ,,, नाहीतर बुक्कीत टेंगूळ) हरी हरी सीतापती सीताराम", असं कॅप्शन देत साक्षीने तिची पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या कॅप्शनवरुन या दोघांची मैत्री किती खोलवर रुजली आहे. याचा अंदाज येतो.