प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने चालवली बोट, म्हणाली, “माधुरी दीक्षितचा व्हिडिओ पाहून...”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 04:04 PM2023-07-27T16:04:12+5:302023-07-27T16:16:24+5:30

माधुरी दीक्षितला बोट चालवताना पाहून मराठी अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ, म्हणाली...

marathi actress rujuta deshmukh drive boat shared video on social media madhuri dixit | प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने चालवली बोट, म्हणाली, “माधुरी दीक्षितचा व्हिडिओ पाहून...”

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने चालवली बोट, म्हणाली, “माधुरी दीक्षितचा व्हिडिओ पाहून...”

googlenewsNext

ऋजुता देशमुख ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ऋजुताने नाटक, मालिका आणि चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारुन अभिनयाचा ठसा उमटवला. छोट्या पडद्यावरील ‘कळत नकळत’ ही तिची मालिका विशेष गाजली. या मालिकेमुळे तिच्या चाहत्या वर्गात भर पडली होती. ऋजुता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच तिने शेअर केलेल्या एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे.

ऋजुताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन माधुरी दीक्षित आणि तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित बोट चालवताना दिसत आहे. तर दुसरीकडे ऋजुताही बोट चालवत आहे. ऋजुताने केरळमध्ये असताना बोट चालवल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. शिवाय, माधुरी दीक्षितला बोट चालवताना बघून तिला व्हिडिओ शेअर करण्याचा मोह आवरता आलेला नाही, असंही तिने म्हटलं आहे. “माझा video १३ जुलैला शूट केला आहे (केरळ). आज माधुरी यांचा व्हिडिओ बघून माझा video post करायची इच्छा झाली”, असं ऋजुताने व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

“आमच्या व्हॅनवर ते दगड मारायला...”, अमिषा पटेलने सांगितला ‘गदर २’च्या शूटिंगचा ‘तो’ प्रसंग

ऋजुताच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. तर मराठमोळा अभिनेता आस्ताद काळेनेही ऋजुताच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. “आता खरंच बोट घे तू. मडला यायला किती सोपं होईल बघ. मी तुला मागेच म्हटलं होतं,” अशी कमेंट आस्तादने केली आहे.

“ब्रा एकवचनी आणि...”, महिलांच्या अंर्तवस्त्रावरुन केलेल्या ‘त्या’ ट्वीटमुळे अमिताभ बच्चन ट्रोल

‘राजा शिवछत्रपती’, ‘जाऊ नको दूर बाबा’ या मालिकांमध्ये ऋजुता झळकली होती. तिने ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘विकून टाक, ‘धुमाकूळ’ अशा अनेक चित्रपटांत काम केलं आहे. सध्या ती झी वाहिनीवरील ‘३६ गुणी जोडी’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Web Title: marathi actress rujuta deshmukh drive boat shared video on social media madhuri dixit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.