“ब्रा एकवचनी आणि...”, महिलांच्या अंर्तवस्त्रावरुन केलेल्या ‘त्या’ ट्वीटमुळे अमिताभ बच्चन ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 12:01 PM2023-07-27T12:01:37+5:302023-07-27T12:02:21+5:30

महिलांच्या अंर्तवस्त्राबाबत केलेल्या ‘त्या’ ट्वीटमुळे बिग बी ट्रोल, नेटकरी म्हणाले “केबीसीमध्ये...”

Amitabh Bachchan trolled for old tweet about womens innerwear goes viral | “ब्रा एकवचनी आणि...”, महिलांच्या अंर्तवस्त्रावरुन केलेल्या ‘त्या’ ट्वीटमुळे अमिताभ बच्चन ट्रोल

“ब्रा एकवचनी आणि...”, महिलांच्या अंर्तवस्त्रावरुन केलेल्या ‘त्या’ ट्वीटमुळे अमिताभ बच्चन ट्रोल

googlenewsNext

बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ते नेहमीच ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. अनेकदा बिग बींचे ट्वीट चर्चेचा विषय ठरतो. आतादेखील अमिताभ बच्चन अशाच एका ट्वीटमुळे चर्चेत आले आहेत. परंतु, यावेळी त्यांना ट्वीटमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

अमिताभ बच्चन यांचं जुनं ट्वीट व्हायरल होत आहे. २०१० साली बिग बी यांनी महिलांच्या अंर्तवस्त्राबाबत एक ट्वीट केलं होतं. “इंग्रजीमध्ये ब्रा एकवचनी आणि पॅन्टीज अनेकवचनी, असं का?” अशा आशयाचं ट्वीट अमिताभ बच्चन यांनी १२ जून २०१० रोजी केलं होतं.

या जुन्या ट्वीटमुळे नेटकरी अमिताभ बच्चन यांना ट्रोल करत आहेत. एकाने “तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती”, असं म्हटलं आहे.

तर दुसऱ्याने “चांगला प्रश्न आहे...केबीसीच्या पुढच्या पर्वात विचारा,” अशी कमेंट केली आहे. “कोणीतरी महत्त्वाचा प्रश्न विचारला”, असं एकाने म्हटलं आहे.

दरम्यान, बिग बी लवकरच ‘कौन बनेगा करोडपती’चा पुढचा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याबरोबरच नाग अश्विन यांच्या 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटातही ते महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटात बिग बींसह प्रभास, दीपिका पदुकोण आणि कमल हसन मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: Amitabh Bachchan trolled for old tweet about womens innerwear goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.