रेश्मा शिंदेच्या 'अहो'ला पाहिलं का? खास पाहुण्यासह पहिल्यांदाच शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 12:52 IST2022-05-04T12:51:44+5:302022-05-04T12:52:03+5:30

Reshma shinde: रेश्मादेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा कायम प्रयत्न करत असते. त्यामुळे अनेकदा ती तिच्या जीवनातील लहानमोठे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.

marathi actress reshma shinde share new instagram post for special person | रेश्मा शिंदेच्या 'अहो'ला पाहिलं का? खास पाहुण्यासह पहिल्यांदाच शेअर केला फोटो

रेश्मा शिंदेच्या 'अहो'ला पाहिलं का? खास पाहुण्यासह पहिल्यांदाच शेअर केला फोटो

'रंग माझा वेगळा' (rang maza wegla) या मालिकेच्या माध्यमातून प्रचंड यश संपादन करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे (reshma shinde). या मालिकेत दिपा ही भूमिका साकारुन ती घराघरात पोहोचली. त्यामुळेच आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. रेश्मादेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा कायम प्रयत्न करत असते. त्यामुळे अनेकदा ती तिच्या जीवनातील लहानमोठे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी तिने तिच्या अहोंसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोला हटके कॅप्शन देत तिने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

अलिकडेच रेश्माने इन्स्टाग्रामवर एक नवी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एका पाळीव कुत्र्यासोबत फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे तिने या श्वानाला 'अहो' असं प्रेमाने नाव दिलं आहे. 

"हाच काय तो आमचा शेवटचा एकत्र फोटो🤐 Happy Birthday Aaho urf #DON @aaho.pai #tragedyoflife #smartboy", असं कॅप्शन देत तिने हा क्यूट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये या श्वानासह रेश्मा दिसून येत आहे.

दरम्यान, रेश्माच्या या अहोचं खरं नाव 'डॉन' असं असून तो अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती मेहूल पै यांचा पाळीव कुत्रा असल्याचं दिसून येतं. या श्वानाच्या नावाने इन्स्टाग्रामवर  @aaho.pai हे अकाऊंटदेखील आहे. या पेजवर अहोचे असंख्य फोटो मेहुलने शेअर केले आहेत.

Web Title: marathi actress reshma shinde share new instagram post for special person