प्रार्थना बेहरेच्या सख्या बहिणीला कधी पाहिलंय का? दोघी बहिणी दिसतात एकदम वेगळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 14:09 IST2022-06-26T14:08:44+5:302022-06-26T14:09:21+5:30
Prarthana behere: प्रार्थनाच्या बहिणीचं नाव गायत्री असून ती तिची मोठी बहीण असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. मात्र, त्या एकमेकींपासून बऱ्याच वेगळ्या दिसतात.

प्रार्थना बेहरेच्या सख्या बहिणीला कधी पाहिलंय का? दोघी बहिणी दिसतात एकदम वेगळ्या
उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे (Prarthana behere). सध्या प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचसोबत ती सोशल मीडियावरही सक्रीय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. यात नुकतीच तिने एक पोस्ट शेअर करत तिच्या सख्या बहिणीची ओळख चाहत्यांसोबत करुन दिली आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या नेहाने म्हणजेच प्रार्थनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रार्थनासोबत तिची सख्खी बहीण दिसत असल्याचं पाहायला मिळत आहे. बहिणीचा वाढदिवस असल्यामुळे तिला शुभेच्छा देण्यासाठी प्रार्थनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, प्रार्थनाच्या बहिणीचं नाव गायत्री असून ती तिची मोठी बहीण असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. मात्र, त्या एकमेकींपासून बऱ्याच वेगळ्या दिसतात. इतकंच नाही तर गायत्री प्रचंड साधी असल्याचं पाहायला मिळतं.