प्रार्थनाच्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका; पाहा 'बॉर्डर' चित्रपटातील गाण्यावर तिचा खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 17:11 IST2022-03-20T17:10:52+5:302022-03-20T17:11:27+5:30

Prarthana behere: 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत नेहा ही भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे.

marathi actress Prarthana behere share her video on the song from the movie Border | प्रार्थनाच्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका; पाहा 'बॉर्डर' चित्रपटातील गाण्यावर तिचा खास व्हिडीओ

प्रार्थनाच्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका; पाहा 'बॉर्डर' चित्रपटातील गाण्यावर तिचा खास व्हिडीओ

आपल्या सौंदर्यामुळे अनेकांना घायाळ करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. अनेक हिंदी मालिका, मराठी चित्रपटांमध्ये झळकलेली प्रार्थना सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत नेहा ही भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे. विशेष म्हणजे कलाविश्वप्रमाणेच सोशल मीडियावरही प्रार्थना सक्रीय असून अनेकदा तिचे व्हिडीओ, फोटो शेअर करत असते.

अलिकडेच प्रार्थनाने इन्स्टाग्रामवर तिचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने पांढऱ्या रंगाची पातळ साडी नेसली असून यावर गुलाबी रंगाच्या फुलांची डिझाइन करण्यात आली आहे. तसंच यावेळी तिने हलका मेकअप केला आहे. सोबतच सुंदर हेअर स्टाइलदेखील केली आहे.

प्रार्थनाने शेअर केलेला हा व्हिडीओ एका पुरस्कार सोहळ्यातील असून यावेळी बँकग्राऊंडला 'बॉर्डर' चित्रपटातील 'हमे जबसे महोब्बत हो गई है' हे गाणं सुरु असल्याचं दिसून येतं. दरम्यान, यावेळी प्रार्थनाचं निखळ हास्य आणि तिचा लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

Web Title: marathi actress Prarthana behere share her video on the song from the movie Border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.