प्रार्थना बेहरे नव्हे त्यांच्या घरातील 'हा' सदस्य आहे सगळ्यात जास्त फिल्मी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 18:10 IST2023-05-15T18:09:57+5:302023-05-15T18:10:40+5:30
Prarthana behere: उत्तम अभिनय आणि सौंदर्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रार्थना त्यांच्या घरातल्यांच्या दृष्टीने अजिबात फिल्मी नाही. तर दुसराच एक सदस्य आहे.

प्रार्थना बेहरे नव्हे त्यांच्या घरातील 'हा' सदस्य आहे सगळ्यात जास्त फिल्मी
सध्याच्या घडीला प्रार्थना बेहरे (prarthana behere) हे नाव कोणासाठीही नवीन नाही. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या माध्यमातून प्रार्थना घराघरात पोहोचलेली. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते. सध्या नेटकऱ्यांमध्ये प्रार्थनापेक्षा तिच्या घरातील एका सदस्याची चर्चा रंगली आहे. हा सदस्य खऱ्या अर्थाने फिल्मी आहे.
प्रार्थना एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यामुळे तिने मराठीसह अनेक हिंदी मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे उत्तम अभिनय आणि सौंदर्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रार्थना त्यांच्या घरातल्यांच्या दृष्टीने अजिबात फिल्मी नाही. तर दुसराच एक सदस्य आहे.
प्रार्थनाच्या घरातील तिचा पाळीव श्वान खऱ्या अर्थाने फिल्मी आहे. त्याच्या फिल्मी असण्यामागेही एक कारण आहे. प्रार्थनाच्या या श्वानाचं नावचं मुळात फिल्मी आहे. हा श्वान प्रार्थनाचा प्रचंड लाडका असून त्याचं इन्स्टाग्रामवर स्वतंत्र पेजदेखील आहे. अलिकडेच तिने या श्वानासोबतचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती वारंवार फिल्मीला बोलवण्याचा प्रयत्न करते. मात्र, तो त्याच्या मस्ती करण्यात दंग होता.
दरम्यान, प्रार्थनाला प्राण्यांची विशेष आवड असून तिच्याकडे दोन पाळीव श्वान आहे. या श्वानांसोबतचे बरेच फोटो, व्हिडीओ ती नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते.