'बॉस लेडी' लूकमध्ये प्राजक्ताचा जबरदस्त ॲटिट्यूड; नव्या फोटोशूटमध्ये दिसली अभिनेत्रीची हटके झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 13:13 IST2024-04-30T13:12:47+5:302024-04-30T13:13:32+5:30

Prajakta mali: प्राजक्ताने नुकतंच एक नवीन फोटोशूट केलं आहे.

marathi actress Prajakta's mali attitude in Boss Lady look photos viral | 'बॉस लेडी' लूकमध्ये प्राजक्ताचा जबरदस्त ॲटिट्यूड; नव्या फोटोशूटमध्ये दिसली अभिनेत्रीची हटके झलक

'बॉस लेडी' लूकमध्ये प्राजक्ताचा जबरदस्त ॲटिट्यूड; नव्या फोटोशूटमध्ये दिसली अभिनेत्रीची हटके झलक

अल्पावधीत मराठी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (prajakta mali). प्राजक्ता अभिनेत्री असण्यासोबतच यशस्वी उद्योजिका, व्यावसायिका, सूत्रसंचालिका म्हणूनही नावारुपाला आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते. यात नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे ज्यात तिचा कमाल अॅटिट्यूड दिसून येत आहे.

प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे त्यामुळे ती कायम नवनवीन फोटोशूट, व्हिडीओ वा ब्रँड प्रमोशन करत असते. यात नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचा एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती बॉस लूकमध्ये दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ताने काळ्या रंगाचा ब्लेझर आणि ट्राउझर परिधान केली आहे. सोबतच त्याला मॅच होणारी गोल्डन रंगाची ज्वेलरी घातली आहे. या लूकमध्ये ती कमालीची कॉन्फिडंट दिसत असून तिचा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड पाहायला मिळत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Web Title: marathi actress Prajakta's mali attitude in Boss Lady look photos viral