'आणि खरंच प्रार्थना पूर्ण होतात..' अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलं हरीहरेश्वराचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 16:46 IST2022-03-01T16:30:45+5:302022-03-01T16:46:37+5:30

नुकतंच प्राजक्ताने  महाशिवरात्रीनिमित्त कोकणातली हरीहरेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं.

Marathi actress prajakta mali visited in harihareshwar temple | 'आणि खरंच प्रार्थना पूर्ण होतात..' अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलं हरीहरेश्वराचं दर्शन

'आणि खरंच प्रार्थना पूर्ण होतात..' अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलं हरीहरेश्वराचं दर्शन

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आपले फोटो, व्हिडीओच्या माध्यामातून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकतंच प्राजक्ताने  महाशिवरात्रीनिमित्त कोकणातली हरीहरेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं. आजच्या दिवशी तिचा उपवास असतो ती सुध्दा एक शिवभक्त आहे. त्यामुळे मोठ्या श्रध्देने तिने शंकराचं दर्शन घेतलं आणि इथल्या देवदर्शनाने तिला खरंच आपल्या प्रार्थना पूर्ण होतायत असं वाटलं. आपल्या मनातल्या भावना तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या.

या पोस्टमध्ये तिने लिहलं की, नुकतीच मी “हरीहरेश्वराला” जाऊन आले… (श्रीवर्धन जवळील) (आणि खरचच प्रार्थना पुर्ण होतायेत अस वाटतय.)हरीहरेश्वर - हरी (विष्णू) , हर (शिव), ईश्वर (ब्रम्हा) अशी ३ स्वयंभू लिंग आहेत.मुळात हे मंदिर ३ डोंगरांच्या मध्ये वसलय त्यामुळे त्याच हे नाव असावं अस मला वाटत. तसं तर; शिव हे तत्व (energy) आहे असच आम्ही मानतो. आणि ध्यानामार्गे त्या तत्वाच्या जवळ जाऊ पाहतो. तर आज उपास आणि महादेव दर्शनाव्यतिरिक्त ध्यान जरूर करा.

प्राजक्तानं 2011 साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिनं सावित्री ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ती जुळून येती रेशिम गाठी, नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकांमध्ये काम केलं. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत तिनं साकारलेल्या मेघा देसाई या व्यक्तिरेखेला प्रचंड लोकप्रियता मिळाली.. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी शोमध्ये होस्टच्या भूमिकेत झळकत आहे.

Web Title: Marathi actress prajakta mali visited in harihareshwar temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.