"तो माझ्याशी खोटं बोलायचा आणि...", लव्हलाइफबाबत प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 14:19 IST2024-01-04T14:18:52+5:302024-01-04T14:19:16+5:30

ब्रेकअपबाबत प्राजक्ता माळी पहिल्यांदाच बोलली, म्हणाली, "पाच वर्षांपूर्वी..."

marathi actress prajakta mali talk about her love life said he lied to me | "तो माझ्याशी खोटं बोलायचा आणि...", लव्हलाइफबाबत प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा

"तो माझ्याशी खोटं बोलायचा आणि...", लव्हलाइफबाबत प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा

प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. अभिनयाबरोबरच सौंदर्यामुळे चाहत्यांना भुरळ पाडणारी प्राजक्ता अनेकांची क्रश आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ताने तिच्या लव्हलाइफबाबत खुलासा केला आहे. प्राजक्ताने लव्हलाइफबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

गुणी अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुलाखतीत अभिनय विश्वातील करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ताने पहिल्यांदाच लव्हलाइफ आणि लग्नाबाबत भाष्य केलं. ती म्हणाली, "डोक्यांची मंडई होणार असेल तर मला लग्न करायंच नाही. शांततेला माझ्या आयुष्यात प्राधान्य असेल. कारण, डोक जागेवर नसेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. एक लाइफ पार्टनर तुमचं सगळं आयुष्य बदलवू शकतो. तुमचं जगणं, भविष्य, मेंटल हेल्थ सगळंच बदलून जातं. त्यामुळे मला वाटतं लग्न ही एक रिस्कच आहे. प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणा या तीनच गोष्टींवर नातं टिकतं. या कलियुगात याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. ते नातं जर खरं असेल तरच टिकेल." 

लव्हलाइफबाबत प्राजक्ता म्हणाली, "मी प्रेमात पडते. पण, नंतर मला कळतं की हे शेवटपर्यंत नसेल. मग मी त्यातून बाहेर पडते. आपण थांबूया असं मी पाच वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे. तो माझ्याशी खोटं बोलायचा आणि मी त्याला पकडलं होतं. पण, तो ते मान्यच करत नव्हता. तुमच्यात खरं बोलण्याची हिंमत पाहिजे." 

प्राजक्ताने अनेक मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. सध्या ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं सूत्रसंचालन करून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 'पांडू', 'चंद्रमुखी', 'लकडाऊन बी पॉजिटिव्ह', 'खोखो', 'व्हाय' अशा सिनेमांत ती झळकली. तिने रानबाजार या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.

Web Title: marathi actress prajakta mali talk about her love life said he lied to me