"नाही नाही…मी लग्न करत नाहीये, पण...", प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 13:19 IST2023-12-01T13:18:17+5:302023-12-01T13:19:11+5:30

प्राजक्ताच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

marathi actress prajakta mali shared post goes viral said im not getting married | "नाही नाही…मी लग्न करत नाहीये, पण...", प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

"नाही नाही…मी लग्न करत नाहीये, पण...", प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

मराठी कलाविश्वातील गोड आणि बहुगुणी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली प्राजक्ता नंतर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये झळकली. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. अनेकांचा क्रश असलेली प्राजक्ता लग्न कधी करणार? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. तिच्या फोटोवर अनेकदा चाहते कमेंटमध्ये तिला प्रपोजही करतात. आता पुन्हा एकदा प्राजक्ताच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक केल्याचं दिसत आहे. पैठणीत प्राजक्ताचं सौंदर्य अधिक खुलून आलं आहे. तिने पारंपरिक दागिन्यांचा साज करत नाकात नथ आणि हातात हिरव्या बांगड्या घालत नववधूसारखा लूक केला आहे.  "नववधू प्रिया मी बावरते…", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. त्यामुळे सुरुवातीला कॅप्शन वाचून प्राजक्ता लग्न करतेय का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण, पुढे लगेचच प्राजक्ताने लग्न करत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. "नाही नाही नाही…मी लग्न करत नाहीये," असं पुढे प्राजक्ताने म्हटलं आहे. 

सध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. मालिका आणि चित्रपटांबरोबरच तिने वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. प्राजक्ताने 'प्राजक्तराज' या नावाने तिचा ज्वेलरी ब्रँडही सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच तिने कर्जतमध्ये 'प्राजक्तकुंज' नावाने फार्म हाऊस घेतलं आहे. 
 

Web Title: marathi actress prajakta mali shared post goes viral said im not getting married