'निगाहें मिलाने को जी चाहता है'; प्राजक्ता माळीची ती पोस्ट नेमकी कोणासाठी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 16:03 IST2023-04-25T16:02:13+5:302023-04-25T16:03:12+5:30
Prajakta mali: प्राजक्ता इन्स्टाग्रामवर सक्रीय असून तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिने दिलेलं कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

'निगाहें मिलाने को जी चाहता है'; प्राजक्ता माळीची ती पोस्ट नेमकी कोणासाठी?
आपल्या स्मित हास्यामुळे अनेक तरुणांच्या काळजावर घाव करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (prajakta mali). उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारी प्राजक्ता सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे कायम नवनवीन पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. यात अलिकडेच तिने एक नवीन पोस्ट शेअर केली असून त्याचं कॅप्शन चर्चेत आलं आहे.
प्राजक्ता इन्स्टाग्रामवर सक्रीय असून तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिने दिलेलं कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. "निगाहें मिलाने को जी चाहता है । दिल-ओ-जान लुटाने को जी चाहता है।", असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा होत आहे.
दरम्यान, प्राजक्ता वरचेवर नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. उत्तम अभिनेत्री असलेली प्राजक्ता मालिका, सिनेमा आणि वेबसीरिज अशा अनेक माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक व्यावसायिकदेखील आहे. नुकताच तिने प्राजक्तराज हा तिचा नवा दागिन्यांचा व्यवसाय सुरु केला आहे.