बहुचर्चित 'छोरी-२' सिनेमात झळकणार 'ही' मराठी अभिनेत्री; नुसरत भरुचासोबत करणार स्क्रीन शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:37 IST2025-04-04T12:32:48+5:302025-04-04T12:37:06+5:30

विशाल फुरिया दिग्दर्शित 'छोरी २' (chhorii 2) या सिनेमाची सध्या चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा आहे.

marathi actress pallavi patil will be seen in the much talked movie chhori 2 will share screen space with nusrat bharucha | बहुचर्चित 'छोरी-२' सिनेमात झळकणार 'ही' मराठी अभिनेत्री; नुसरत भरुचासोबत करणार स्क्रीन शेअर

बहुचर्चित 'छोरी-२' सिनेमात झळकणार 'ही' मराठी अभिनेत्री; नुसरत भरुचासोबत करणार स्क्रीन शेअर

Chhori-2 : विशाल फुरिया दिग्दर्शित 'छोरी २'  (chhorii 2) या सिनेमाची सध्या चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा आहे. बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (nusrat bharucha) आणि सोहा अली खान (Soha Ali Khan)यांची मुख्य भूमिका असलेला हा भयपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा काळजाचा थरकाप उडवणाऱ्याने ट्रेलरने सिनेरसिकाचं लक्ष वेधून घेतल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, या चित्रपटात एक मराठमोळा चेहरा देखील झळकणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे पल्लवी पाटील आहे. त्यामुळे तिचे चाहते प्रचंड आनंदी आहेत.


अभिनेत्री पल्लवी पाटीलने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पल्लवी रुंजी या मालिकेतून लोकप्रियता मिळाली. आजही पल्लवी पाटील 'रुंजी' मालिकेमुळेच चाहत्यांच्या लक्षात आहे. तिने 'बापमाणूस', 'अग्निहोत्र 2', 'वैदही' अशा मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. लवकरच पल्लवी पाटील एका नव्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. छोरी-२ मध्ये नुसरत भरुचासोबत ती स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. त्यामध्ये पल्लवी पाटीलची एक झलक पाहायला मिळते आहे. 'छोरी-२' च्या ट्रेलरमध्ये एक महिला मुलींना गोष्ट सांगते की, "एक राजा होता. त्याला मुलगा हवा होता पण झाली मुलगी.. मग पुढे?" असा अंगावर काटा आणणारा हा सीन आहे. पुढे एका वाड्यात नुसरत भरुचाला कैद केलं जात. सोहा अली खान या वाड्यात भूतनी म्हणून वावरत असतात. मग पुढे या भयावह चक्रव्यूहातून नुसरत स्वतःला कशी बाहेर काढते, याची कहाणी 'छोरी २'च्या ट्रेलरमध्ये बघायला मिळतेय. 'छोरी २' सिनेमा ११ एप्रिलला प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Web Title: marathi actress pallavi patil will be seen in the much talked movie chhori 2 will share screen space with nusrat bharucha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.