"ही कुठे अभिनेत्री? ही तर डान्सर, अजूनही लोक...",‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम चेतना भटला बोलताना अश्रू अनावर, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 14:42 IST2025-10-24T14:35:19+5:302025-10-24T14:42:32+5:30
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम चेतना भटला बोलताना अश्रू अनावर, म्हणाली-"अजूनही लोक...",

"ही कुठे अभिनेत्री? ही तर डान्सर, अजूनही लोक...",‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम चेतना भटला बोलताना अश्रू अनावर, म्हणाली...
Chetana Bhat: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील विनोदवीरांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यातीलच एक नाव म्हणजे चेतना भट. या कार्यक्रमातू चेतना घराघरात लोकप्रिय झाली. चेतना भट हास्यजत्रेत विविध विनोदी पात्र साकारताना दिसते. तिच्या भूमिकांचं अनेकदा कौतुकही होतं. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या अभिनय प्रवासाविषयी भाष्य केलं आहे.
नुकतीच चेतना भटने 'MHJ Unplugged' च्या पॉडकास्ट मध्ये हजेरी लावली. आजवर तिला या अभिनय प्रवासात आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांविषयी तिने सांगितलं. यावेळी चेतना म्हणाली,"मला भांडता येत नाही, पण चिडचिड झाली की रडू येतं. कुठेही नाव सुचवायची वेळ आली की अजूनही लोक म्हणतात, ही कुठली अभिनेत्री आहे. ही फक्त डान्सर आहे. आपण एवढं काम करुनही लोक म्हणत असतील तर त्याचं वाईट वाटतं. मी ती गोष्ट पॉझिटिव्ह घेते. कदाचित त्यांच्या दृष्टिने माझा डान्स इतका चांगला असेल की ते अजून विसरू शकले नाहीत. ठीक आहे. त्याशिवाय माझं डान्सचं काम कसं येणार. लोक विसरू नयेत की मी डान्सर आहे, हेही खरं आहे. काही लोक माझं नाव सुचवतात,पण जेव्हा आपण चांगलं काम करतो आणि पुढे जातो तेव्हा तीच लोकं म्हणतात ही अभिनेत्री नाही, असं ते लोक कसं बोलू शकतात.याचं वाईट वाटतं."
चेतना भटने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शिवाय काही मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अलिकडेच ती 'फुलवंती' चित्रपटात पाहायला मिळाली.