"घट्ट मिठी मारली अन्...", पहिल्यांदाच आईचं नाटक पाहिल्यानंतर 'अशी' होती मधुराणीच्या लेकीची रिअॅक्शन, अभिनेत्री भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 10:06 IST2025-11-04T10:00:41+5:302025-11-04T10:06:54+5:30
लेकीच्या 'त्या' कृतीने भारावली मधुराणी प्रभुलकर! पहिल्यांदाच आईचं नाटक पाहिल्यानंतर 'अशी' होती प्रतिक्रिया

"घट्ट मिठी मारली अन्...", पहिल्यांदाच आईचं नाटक पाहिल्यानंतर 'अशी' होती मधुराणीच्या लेकीची रिअॅक्शन, अभिनेत्री भावुक
Madhurani Prabhulakar: अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीचं पात्र साकारून ती घराघरात पोहोचली. या मालिकेने जरी निरोप घेतला असली तरी मधुराणी नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. सध्या रंगभूमीवर अभिनेत्रीचं 'ज्याचा त्याचा विठ्ठल' हे नाटक जोरदार सुरु आहे. अनेकदा मधुराणी या नाटकाच्या संदर्भात सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते.तिच्या नाटकाला मिळणारी प्रेक्षकांची दाद, त्यादरम्यानचे अविस्मरणीय क्षण टिपून ती चाहत्यांसोबत शेअर करते. नुकतीच मधुराणीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असल्याची पाहायला मिळतेय.
अलिकडेच मधुराणी प्रभुलकरच्या 'ज्याचा त्याचा विठ्ठल' नाटकाचा प्रयोग पार पडला.यादरम्यान, एका खास चाहतीकडून तिला दाद मिळाली.  ही चाहती म्हणजे अभिनेत्री लेक होय. मधुराणीने तिची लेक स्वरालीने नाटक पहिल्यांदा पाहिल्यानंतर कशी प्रतिक्रिया होती, याबद्दलचा अनुभव तिने पोस्टद्वारे सांगितला आहे.
या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लेकीचा आणि तिचा गोड फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिची लेक तिला घट्ट मिठी मारल्याची पाहायला मिळतेय. दरम्यान, या पोस्ट सुंदर असा अनुभव कथन करत मधुराणीने म्हटलंय, 'ज्याचा त्याचा विठ्ठल' च्या प्रयोगानंतर मिळालेली सगळ्यात अमूल्य दाद...!!!! भंडारकर इन्स्टिट्यूट च्या समवसरण रंगमंचावर मागच्या शनिवारी प्रयोग झाला.स्वराली आज हा प्रयोग प्रथमच पाहणार होती. इतके दिवस मी तिला न्यायाला थोडी साशंक होते. सीतिला कळेल का ? आवडेल का? सलग पावणेदोन तास बसेल का ?' अशा अनेक शंका होत्या. "
यापुढे मधुराणी प्रभुलकर म्हणते, "आज आपणहूनच म्हणाली मी येते.... आली आणि विठ्ठलमय होऊन गेली... या वयात हे नाटक तिने पाहणं आणि तिच्या आत ते खोलवर कुठेतरी उतरणं हे निव्वळ अद्भुत....! प्रयोगानंतर ती निःशब्द होती ... प्रतिक्रिया म्हणून बराच वेळ नुसती घट्ट मिठी मारून थांबली होती. तिच्या चेहऱ्यावरचे हे मुग्ध भाव टिपणाऱ्या माझ्या मित्राची , अमित देशपांडेची मी शतशः आभारी आहे. ह्या वर्षातली मला मिळालेली ही सगळ्यात अमूल्य ' भेट ' आहे. " अशा आशयाची पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे.
दरम्यान,मधुराणी प्रभुलकरची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स द्वारे त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. "किती गोड पावती आहे ना....", "निशब्द प्रेम…",अशा कमेंट्स करत चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.