"त्याच्याकडे बघून रडायचे...", बाळाच्या जन्मानंतर मराठी अभिनेत्रीची झालेली 'अशी' अवस्था, म्हणाली-"तो काळ…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:22 IST2025-12-08T18:10:47+5:302025-12-08T18:22:23+5:30
बाळाच्या जन्मानंतर 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्रीने केला नैराश्याचा सामना, म्हणाली..

"त्याच्याकडे बघून रडायचे...", बाळाच्या जन्मानंतर मराठी अभिनेत्रीची झालेली 'अशी' अवस्था, म्हणाली-"तो काळ…"
Pallavi Vaidya: अभिनेत्री पल्लवी तिचा पतीही मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये पल्लवी झळकली आहे.सध्या पल्लवी लक्ष्मीनिवास मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेत ती रेणूका नावाचं पात्र साकारते आहे. पल्लवी सोशल मीडियावरही हल्ली कमालीची सक्रिय असते. शिवाय तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल ती सांगत असते. आता एका मुलाखतीत पल्लवीने मुलाच्या जन्मानंतर ती नैराश्यात गेल्याचं सांगितलं आहे.
नुकतीच अभिनेत्री पल्लवी वैद्यने राजश्री मराठीला मुलाखत दिली.या मुलाखतीत तिचा मुलगा अथांग झाल्यानंतर नैराश्याचा सामना केल्याचं सांगितले आहे.या काळात तिचा नवरा आणि सासरच्या मंडळींनी खूप साथ दिली. तेव्हा पल्लवी म्हणाली, खरंतर मी आता इथे पहिल्यांदाच सांगते आहे. डिलिव्हरीनंतर काही बायकांच्या आयु्ष्यात एक काळ येतो जेव्हा त्यांनी डिप्रेशनचा सामना करावा लागतो. तर तो काळ मीदेखील अनुभवला आहे."
मग पल्लवीने म्हटलं, "मला माहित नाही काय झालं होतं. मी सतत त्याच्याकडे बघून रडायचे. त्यावेळी कितीतरी कलाकारांनी मला फोन केले की आम्ही बाळाला बघायला येतोय तर येऊ ना. तर मी त्यांना नका येऊ असं म्हटलंय. त्यांनी मी दुखावलं. नैराश्यातून बाहेर आल्यानंतर मी त्यांच्याशी बोलले.त्यांना फोन करून मी त्यांची माफी मागितली. अशा गोष्टी माझ्याकडून घडल्यात.तर मला आता तो काळ आठवला तर मला असं वाटतं की तो काळ नको. पण, ती आठवण माझ्या डोक्यातून कधीच निघून जाणार नाही. कारण ते घडून गेलं आहे. अथांग झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात मी नैराश्यात गेले होते."
वर्कफ्रंट
अभिनेत्री पल्लवी वैद्यच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने ‘अगंबाई अरेच्चा!’ या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. ‘अजुनही बरसात आहे’, 'स्वराज्यरक्षक संभाजी', 'तुझेच मी गीत गात आहे' अशा मालिकांमध्ये ती झळकली आहे.