'तू मुलांना नादी लावतेस'; जुई गडकरीच्या जिव्हारी लागला होता टोमणा, अभिनेत्रीची झाली होती अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 04:24 PM2024-02-04T16:24:12+5:302024-02-04T16:48:26+5:30

Jui gadkari: जुईने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या करिअरविषयी बरेच खुलासे केले आहेत.

marathi actress jui-gadkari-talked-about-how-she-faces-body-shaming-and-taunts-on-serial-set | 'तू मुलांना नादी लावतेस'; जुई गडकरीच्या जिव्हारी लागला होता टोमणा, अभिनेत्रीची झाली होती अशी अवस्था

'तू मुलांना नादी लावतेस'; जुई गडकरीच्या जिव्हारी लागला होता टोमणा, अभिनेत्रीची झाली होती अशी अवस्था

'पुढचं पाऊल' या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी (jui gadkari). उत्तम अभिनयशैली आणि सोज्वळपणा यांच्या जोरावर जुईने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. कर्जतच्या या लेकीने कलाविश्वात तिचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. मात्र, तिचा हा प्रवास सोपा नव्हता. आजारपण, लोकांचे टोमणे, आजुबाजूला नकारात्मक वातावरण या सगळ्यातून जुई गेली आहे. परंतु, या सगळ्या बिकट परिस्थितीवर मात करत तिने तिचा मार्ग काढला. अलिकडेच जुईने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये लोकांनी तिला कशा प्रकारे खालच्या दर्जाला जाऊन ट्रोल केलं हे तिने सांगितलं.

अलिकडेच जुईने राजश्री मराठीच्या 'तिची गोष्ट' या सेगमेंटमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या कठीण काळावर भाष्य केलं आहे. एक वेळ अशी होती जेव्हा प्रत्येकाने तिचं बॉडी शेमिंग केलं. इतकंच नाही तर 'तू मुलांना नादी लावतेस', असा खोचक टोला तिला लगावला गेला होता.

काय म्हणाली जुई?

"वाईट बोलणारे लोक तर काय वाट्टेल ते बोलत असतात. अनेकदा माझं  बॉडी शेमिंग केलं गेलंय. बारीक आहेस, सावळी आहेस असं म्हटलं गेलंय. यात एक कमेंट अशी होती जी मला खूप लागली होती. ती म्हणजे, 'तू मुलांना नादी लावतेस', हे वाक्य मी माझ्या बद्दल ऐकलं. मी कधीच कुणाच्या अध्यात मध्यात नसते. तर मला किती त्रास झाला असेल. आणि अशा व्यक्तीकडून ही कमेंट यावी जिने बोलूच नये नीतिमत्ता वगैरेच्या बाबतीत.  मी गोष्टी मनाला लावून घेत नाही पण डोक्यात राहतात. मी नादी लावणारी असते तर मी खूप जणांना नादी लावून माझं लग्नही झालं असतं. तेव्हा मी लहान होते. मी रडायचे", असं जुई म्हणाली.

पुढे ती म्हणाते, "मला माझ्या आईने सांगितलेलं विचार करायचा. या गोष्टी तिथल्या तिथे ठेवायच्या. नाही तर माझे बाबा अजूनच डेंजर. ते म्हणायचे तुझ्या बापाने कुणाचं ऐकून घेतलं नाही कधी. ऐकून घेत जाऊ नकोस. तिथल्या तिथे बोलत जा. पण माझं असं होतं की, त्या लोकांना उत्तर द्यावं एवढी त्यांची पात्रता नाहीये. माझं कामच त्यांच्या थोबाडीत मारतं."

दरम्यान, या मुलाखतीमध्ये जुईने तिच्या स्ट्रगल काळातील दिवसांवर सुद्धा भाष्य केलं. जुईने तिच्या अभिनयाच्या जोरावर अल्पावधीत कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. पुढचं पाऊल या गाजलेल्या मालिकेनंतर ती 'ठरलं तर मग' या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे.

Web Title: marathi actress jui-gadkari-talked-about-how-she-faces-body-shaming-and-taunts-on-serial-set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.