हृताचा प्रतिकसोबतचा Unseen व्हिडीओ व्हायरल; लग्नापूर्वी अन् लग्नानंतरचा प्रवास थोडक्यात केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 17:17 IST2022-07-26T17:16:59+5:302022-07-26T17:17:25+5:30

Hruta durgule: या व्हिडीओमध्ये त्यांच्या अफेअरपासून ते लग्नापर्यंत आणि हनीमूनचे काही निवडक फोटो, व्हिडीओ यांचा कोलाज करण्यात आला आहे.

marathi actress hruta durgule and husband prateek shah romantic video viral | हृताचा प्रतिकसोबतचा Unseen व्हिडीओ व्हायरल; लग्नापूर्वी अन् लग्नानंतरचा प्रवास थोडक्यात केला शेअर

हृताचा प्रतिकसोबतचा Unseen व्हिडीओ व्हायरल; लग्नापूर्वी अन् लग्नानंतरचा प्रवास थोडक्यात केला शेअर

उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (hruta durgule). छोटा पडदा गाजवल्यानंतर हृता लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे सध्या तिला चित्रपटामध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. हृतादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आगामी प्रोजेक्ट्स वा पर्सनल लाइफविषयी माहिती देत असते. यात नुकताच तिने पती प्रतिक शाहसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या दोघांच्या काही मेमरीज पाहायला मिळतात.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ प्रतिकने शेअर केला असून यात त्याने हृताला टॅग केलं आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या अफेअरपासून ते लग्नापर्यंत आणि हनीमूनचे काही निवडक फोटो, व्हिडीओ यांचा कोलाज करण्यात आला आहे.

दरम्यान, हृता आणि प्रतिकने कुटुंबाच्या संमतीने आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये १८ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. हृताच्या लग्नामुळे चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला होता. परंतु, सगळ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. २४ डिसेंबर २०२१ रोजी या दोघांनी साखरपुडा केला होता. प्रतीक शाह हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. 'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यासारख्या मालिकांचे दिग्दर्शन त्याने केले आहे.
 

Web Title: marathi actress hruta durgule and husband prateek shah romantic video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.