'तुझ्यात जीव रंगला'फेम अभिनेत्रीकडे युजरने केली 'ब्रा' मधील फोटोची मागणी; अभिनेत्री म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 13:01 IST2024-01-17T13:01:07+5:302024-01-17T13:01:32+5:30
Marathi actress: अभिनेत्रीने दिलं पुणेरी भाषेत उत्तर, पाहा नेमकं काय म्हणाली ती

'तुझ्यात जीव रंगला'फेम अभिनेत्रीकडे युजरने केली 'ब्रा' मधील फोटोची मागणी; अभिनेत्री म्हणाली...
चाहते आणि सेलिब्रिटी यांना जोडून ठेवण्याचं प्रभावी माध्यम म्हणून आज सोशल मीडियाकडे पाहिलं जातं. मात्र, याच सोशल मीडियामुळे अनेकदा कलाकारांना मनस्तापालाही सामोरं जावं लागतं. बऱ्याचदा चाहते सेलिब्रिटींसोबत बोलताना त्यांच्या मर्यादा विसरतात. ज्यामुळे कलाकारांना नाहक मनस्तापाला समोरं जावं लागतं. इतकंच नाही तर काही युजर्स कलाकारांकडे विचित्र पद्धतीची मागणी करताना दिसतात. असाच अनुभव एका मराठमोळ्या अभिनेत्रीला आला आहे. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर याविषयी पोस्ट सुद्धा शेअर केली आहे.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगांवकर (dhanashri kadgaonkar). अलिकडेच धनश्री तू चाल पुढं या मालिकेत दिसली होती. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर ती चर्चेत आहे. धनश्रीने नुकतचं इन्स्टाग्रामवर एक सेशन घेत चाहत्यांसोबत गप्पा मारल्या. यावेळी एका युजरने थेट तिच्याकडे 'ब्रा'मधील फोटोची मागणी केली. या कमेंटवर तिनेही सडेतोड उत्तर दिलं आहे.
धनश्रीने घेतलेल्या सेशनमध्ये तिने प्रत्येक चाहत्याच्या प्रश्नांची छान उत्तर दिली. मात्र, एका युजरने तिच्याकडे थेट 'ब्रा मधील फोटो पोस्ट करा,' अशी विचित्र मागणी केली. धनश्रीने सुद्धा या युजरची कमेंट सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला रिप्लाय दिला.
काय म्हणाली धनश्री?
'काय करायचं अशा लोकांचं?' असा रिप्लाय देत धनश्रीने या युजरची कमेंट पोस्ट केली आहे. तिच्या या उत्तरावरुन तिने किमान शब्दांत त्याचा कमाल अपमान केल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, धनश्री मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. धनश्रीने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. वहिनीसाहेब या नावाने आज धनश्री मराठी कलाविश्वात खासकरुन ओळखली जाते.