तू चाल पुढं: धनश्रीच्या व्यक्तिरेखेवरील पडदा दूर; नव्या मालिकेत साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 02:30 PM2022-07-15T14:30:00+5:302022-07-15T14:30:00+5:30

Dhanashri kadgaonkar: एक-दीड वर्षाच्या दिर्घ सुट्टीनंतर धनश्री पुन्हा एकदा कलाविश्वात कमबॅक करत आहे. विशेष म्हणजे नव्या मालिकेतही तिचा दरारा पाहायला मिळणार आहे.

marathi actress dhanashri kadgaonkar new serial tu chal pudhe coming soon | तू चाल पुढं: धनश्रीच्या व्यक्तिरेखेवरील पडदा दूर; नव्या मालिकेत साकारणार 'ही' भूमिका

तू चाल पुढं: धनश्रीच्या व्यक्तिरेखेवरील पडदा दूर; नव्या मालिकेत साकारणार 'ही' भूमिका

googlenewsNext

'तुझ्यात जीव रंगला'मधील वहिनीसाहेब ही व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहे. अभिनेत्री धनश्री काडगांवकरने (Dhanashri kadgaonkar) ही भूमिका अत्यंत सुंदररित्या साकारली होती. त्यामुळे मालिकेतील वहिनीसाहेबांचा धाक आणि त्यांचा दरारा आजही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो. या मालिकेनंतर धनश्रीचा कलाविश्वातील वावर कमी झाला होता. या काळात तिने तिचा जास्तीत जास्त वेळ तिच्या लेकाला कबीरला दिला होता. मात्र, एक-दीड वर्षाच्या दिर्घ सुट्टीनंतर धनश्री पुन्हा एकदा कलाविश्वात कमबॅक करत आहे. विशेष म्हणजे नव्या मालिकेतही तिचा हा दरारा पाहायला मिळणार आहे.

झी मराठीवर लवकरच 'तू चाल पुढं' (tu chal pudhe) ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या माध्यमातून धनश्री प्रेक्षकांच्या भेटीला येत असून मालिकेचा प्रोमो व्हायरल झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळेच या मालिकेविषय़ी आणि आपल्या भूमिकेविषयी धनश्रीने तिचं मत व्यक्त केलं आहे.

"या मालिकेत माझ्या व्यक्तिरेखेचं नाव शिल्पी आहे, जी तिच्या माहेरी येऊन राहतेय आणि तिला सतत असं वाटतं कि तिच्या आयुष्यात जे काही चुकीचं घडलं त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त अश्विनी आहे. त्यामुळे शिल्पी अश्विनीला सतत घालून पडून बोलते, प्रत्येक गोष्टींमध्ये तिच्या चुका काढते जस प्रोमोमध्ये देखील प्रेक्षकांनी पाहिलं कि शिल्पी कशी तिच्या वहिनी अश्विनीला टोमणे मारते. अशा प्रकारची एक नकारात्मक भूमिका पुन्हा एकदा मी साकारतेय त्यामुळे जशी वहिनीसाहेब सगळ्यांच्या लक्षात राहिली तशीच शिल्पी देखील प्रेक्षकांच्या मनात घर करेल अशी मी आशा करते," असं धनश्री म्हणाली. दरम्यान, ही मालिका येत्या १५ ऑगस्टपासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: marathi actress dhanashri kadgaonkar new serial tu chal pudhe coming soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.