फक्त फील्स..! Lazy Lad वर स्वीटूने केला हटके डान्स; Video होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 17:33 IST2021-12-03T17:32:30+5:302021-12-03T17:33:27+5:30
Anvita phaltankar: सोशल मीडियावर सक्रीय असलेली अन्विता कायमच तिच्या डान्सचे वेगवेगळे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. विशेष म्हणजे ती प्रत्येक व्हिडीओमध्ये ती तिच्या डान्सने गाण्याला एक वेगळा टच देते.

फक्त फील्स..! Lazy Lad वर स्वीटूने केला हटके डान्स; Video होतोय व्हायरल
'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अन्विता फलटणकर (anvita phaltankar). या मालिकेत अन्विता, स्वीटू ही भूमिका साकारत आहे. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या अन्विताला अभिनयासोबतच डान्सचीही विशेष आवड आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अलिकडेच तिने एका व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली अन्विता कायमच तिच्या डान्सचे वेगवेगळे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. विशेष म्हणजे ती प्रत्येक व्हिडीओमध्ये ती तिच्या डान्सने गाण्याला एक वेगळा टच देत असते. असाच एक नवीन व्हिडीओ तिने शेअर केला आहे.
अन्विताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती Lazy Lad या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये तिचा वेगळाच अंदाज दिसत असून तो प्रेक्षकांना भावत आहे.
दरम्यान, अन्विता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या माध्यमातून ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली.