ठिपक्यांची रांगोळी: अमृता फडकेला 'ही' अभिनेत्री करणार रिप्लेस; मालिकेत दिसणार नवीन मानसी वहिनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 16:57 IST2022-06-14T16:55:42+5:302022-06-14T16:57:01+5:30
Thipkyanchi rangoli: सध्या सोशल मीडियावर या मालिकेसंदर्भातील पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अमृताने ही मालिका सोडल्याचं सांगण्यात येत आहे.

ठिपक्यांची रांगोळी: अमृता फडकेला 'ही' अभिनेत्री करणार रिप्लेस; मालिकेत दिसणार नवीन मानसी वहिनी
अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'ठिपक्यांची रांगोळी' ( thipkyanchi rangoli). एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्त्व सांगणाऱ्या या मालिकेत कानिटकर कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. शरद पोंक्षे, अतुल तोडणकर,लीना भागवत अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या मालिकेतून एका लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतीच एक्झिट घेतली आहे. त्यामुळे या मालिकेत आता नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार असल्याचं दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वीच अप्पू आणि शशांकचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. त्यामुळे कानिटकरांच्या घरात अप्पू आल्यापासून या घराचं वातावरण एकदम बदलून गेलं आहे. विशेष म्हणजे हे एकत्र कुटुंब प्रेक्षकांना विशेष भावत आहे. परंतु, आता या मालिकेत मानसी वहिनींची भूमिका साकारणाऱ्या अमृता फडकेने (amruta phadke) ही मालिका सोडल्याचं सांगण्यात येत आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेसंदर्भातील पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अमृताने ही मालिका सोडल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच तिच्या जागी अभिनेत्री सई कल्याणकर (sai kalyankar) आता या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, सई मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेच्या माध्यमातून ती विशेष लोकप्रिय झाली. 'भेटी लागी जीवा', 'विठू माऊली', 'गणपती बाप्पा मोरया' या मालिकेतही ती झळकली आहे.