'हरवून गेलं रान,तुझ्यात गं साजणी!' सिंपल लूकमधून अक्षयाने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 12:34 IST2023-10-09T12:33:04+5:302023-10-09T12:34:44+5:30
Akshaya deodhar: अक्षयाचा प्रत्येक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो.

'हरवून गेलं रान,तुझ्यात गं साजणी!' सिंपल लूकमधून अक्षयाने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
'तुझ्यात जीव रंगला' या गाजलेल्या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर (akshaya deodhar). गेल्या काही काळामध्ये अक्षयाचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे कायम नवनवीन फोटो, व्हिडीओ पोस्ट करुन ती चर्चेत येत असते.
सध्या अक्षया तिची मॅरिड लाइफ एन्जॉय करतीये. त्यामुळे लग्नानंतरचे सगळे सणवार तिने मोठ्या थाटात साजरे केले आहेत. यात तिचे पारंपरिक लूकमधील प्रत्येक फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले. यामध्येच आता तिने नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
अक्षयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने गुलाबी रंगाची काठपदराची साडी नेसली आहे. या साडीवर तिने हलकासा मेकअप केला असून अगदी मोजके दागीने परिधान केले आहेत. परंतु, तिचा हा लूक सुद्धा प्रचंड मनमोहक आहे. त्यामुळे सध्या तिच्या या लूकची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
दरम्यान, अलिकडेच अक्षयाने तिची पहिली मंगळागौर मोठ्या थाटात साजरी केली. या मंगळागौरीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अक्षया गेल्या काही काळापासून कोणत्याही मालिकेत झळकलेले नाही. मात्र, बऱ्याचदा ती काही ब्रँडचं कोलॅबरेशन करताना दिसते.