अक्षयाचा नवरात्री स्पेशल लूक; सोज्वळपणा पाहून चाहत्यांना आली पाठकबाईंची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 17:17 IST2023-10-16T17:16:10+5:302023-10-16T17:17:56+5:30
Akshaya deodhar: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अक्षयाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अक्षयाचा नवरात्री स्पेशल लूक; सोज्वळपणा पाहून चाहत्यांना आली पाठकबाईंची आठवण
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत पाठक बाई ही भूमिका साकारुन नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर (akshaya deodhar). अक्षयाने अगदी मोजक्या मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, अल्पावधीत तिने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते. अलिकडेच तिने नवरात्रीनिमित्त छान फोटो आणि व्हिडीओ शूट केलं आहे. याची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.
zaया व्हिडीओमध्ये तिने नारंगी आणि हिरवा काठ असलेली छान साडी नेसली आहे. त्याच्यासोबत मराठमोळा साजशृंगार केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने बॅकग्राऊंडला चाफा बोलेना हे गाणं प्ले केलं आहे. त्यामुळे तिचा हा व्हिडीओ आणखीनच सुंदर दिसत आहे.
दरम्यान, अक्षयाने लग्नानंतर तिचे येणारे सगळे सण, उत्सव मोठ्या थाटात साजरे केले आहेत. अलिकडेच तिने मोठ्या थाटात तिची मंगळागौर साजरी केली.