व्हेकेशन मोड ऑन! ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचा सफरनामा, शेअर केला खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 11:54 IST2025-05-15T11:51:50+5:302025-05-15T11:54:03+5:30

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन कपल आहे.

marathi actress aishwarya narkar and avinash narkar vietnam trip shared video on social media  | व्हेकेशन मोड ऑन! ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचा सफरनामा, शेअर केला खास व्हिडीओ

व्हेकेशन मोड ऑन! ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचा सफरनामा, शेअर केला खास व्हिडीओ

Aishwarya Narkar And Avinash Narkar: ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अविनाश नारकर (Avinash Narkar) हे मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत राहणारं कपल आहे. गेली अनेक वर्ष त्यांनी चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमातून अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दरम्यान, ऐश्वर्या आणि अविनाश नारकर हे सोशल मीडियावर तितकेच असल्याचे पाहायला मिळतात. त्यांचे रिल्स व्हिडीओ, फोटो ते चाहत्यांसोबत कायम शेअर करत असतात. शिवाय त्यांच्या व्हिडीओंना चाहत्यांची सुद्धा तितकीच पसंती मिळताना दिसते. सध्या ते आपल्या कामातून वेळ काढत परदेशात फिरायला निघाले आहेत. याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी सोशल मीडियावर त्यांच्या परदेशवारीचे अपडेट्स चाहत्यांना दिले आहेत. व्हेकेशन मोड ऑन असं कॅप्शन देत एअरपोर्टवरील सुंदर व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हातात पासपोर्ट आणि एअरपोर्टवर काही दृश्ये या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. व्हिएतनाम मध्ये हे कपल फिरायला निघालं आहे. त्याचबरोबर व्हिएतनामच्या निसर्गरम्य ठिकाणाची ते सफर करताना दिसत आहे. 


ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. त्यांच्या या व्हिडीओवर मराठी कलाकारांसह चाहत्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, "हॅप्पी जर्नी एव्हरग्रीन कपल...", तर दुसऱ्या युजरने म्हटले की, शुभेच्छा...! सुखरूप परत या". अशा प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्यांनी दिल्या आहेत. 

Web Title: marathi actress aishwarya narkar and avinash narkar vietnam trip shared video on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.