ऐश्वर्या नारकर यांचा वाढदिवस, भावी सूनबाईंनी लिहिली सुंदर पोस्ट, म्हणाली-" सगळ्यात सुंदर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 15:20 IST2025-12-08T15:16:03+5:302025-12-08T15:20:44+5:30
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे.

ऐश्वर्या नारकर यांचा वाढदिवस, भावी सूनबाईंनी लिहिली सुंदर पोस्ट, म्हणाली-" सगळ्यात सुंदर..."
Aishwarya Narkar : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे. ऐश्वर्या नारकर या आपल्या अभिनयासाठी ओळखल्या जातात. त्यांचा चाहतावर्गही कमालीचा मोठा आहे. अनेकदा ऐश्वर्या नारकर या त्यांच्या सोशल मीडियावरील रिल्स, व्हिडीओंमुळे चर्चेत असतात. आज या प्रेक्षकांच्या आवडत्या नायिकेचा वाढदिवस आहे. यादरम्यान, सोशल मीडियावर अभिनेत्रीवर त्यांचे चाहते तसेच अनेक सहकलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. मात्र, या सगळ्यात ऐश्वर्या यांच्यासाठी अभिनेत्री ईशा संजयने शेअर केलेली पोस्ट लक्ष वेधून घेते आहे.
ईशा संजय आणि ऐश्वर्या नारकर यांच्यामध्ये चांगली बॉण्डिंग आहे. शिवात नारकारांचा लेक अमेय आणि ती गेली काही वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा सोशल मीडियावर ईशाने अमेयसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. ते दोघे कॉलेजच्या दिवसापासूनच एकमेकांना ओळखतात.शिवाय मध्यंतरी सोशल मीडियावर आस्क मी सेशनमध्ये तिने आपल्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली होती. दरम्यान,ईशाने आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर ऐश्वर्या नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त दोघींचे सुंदर फोटो व्हिडीओ शेअर करत म्हटलंय,"Happiest birthday to my सगळ्यात सुंदर मैत्रीण! जशी आहेस तशीच रहा. I love youuuu…", अशा आशयाची पोस्ट नारकरांच्या भावी सूनबाईंनी शेअर केली आहे.
वर्कफ्रंट
ईशा संजय ही मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अलिकडेच लाखात एक आमचा दादा मालिकेत ती झळकली होती. उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ईशा उत्तम डान्सरही आहे.