मराठी अभिनेत्रीने शेअर केला राहुल द्रविडबरोबरचा फोटो, तुम्हाला माहितीये का दोघांमधील नातं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 10:38 AM2023-10-21T10:38:12+5:302023-10-21T10:39:06+5:30

राहुल द्रविड आणि 'ही' मराठी अभिनेत्री आहेत एकमेकांचे नातेवाईक, जाणून घ्या त्यांच्यातील नातं

marathi actress aditi dravid shared photo with cricketer rahul dravid do you know relation between them | मराठी अभिनेत्रीने शेअर केला राहुल द्रविडबरोबरचा फोटो, तुम्हाला माहितीये का दोघांमधील नातं?

मराठी अभिनेत्रीने शेअर केला राहुल द्रविडबरोबरचा फोटो, तुम्हाला माहितीये का दोघांमधील नातं?

अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम करुन लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे अदिती द्रविड. 'माझ्या नवऱ्याची बायको', 'सुंदरा मनामध्ये भरली' यांसारख्या मालिकांमध्ये अदिती महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. अदिती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबद्दल ती पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असते. अनेकदा ती फोटोही शेअर करताना दिसते. सध्या अदितीने शेअर केलेल्य अशाच एका फोटोची चर्चा रंगली आहे. 

अदितीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन भारताचा माजी क्रिकेटर राहुल द्रविडबरोबर फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने "द्रविड" असं कॅप्शन दिलं आहे. राहुल द्रविडला अदितीने या पोस्टमध्ये टॅगही केलं आहे. अदिती आणि राहुल यांचं आडनाव सेम असल्यामुळे ते एकमेकांचे नातेवाईक आहेत का? असा प्रश्न अनेकदा चाहत्यांना पडतो. अदितीने एकदा राहुल द्रविड आणि तिच्यामधील नात्याबाबत भाष्य केलं होतं. त्या दोघांमधील नेमकं नातं काय आहे? याचा खुलासा अदितीने केला होता. 

अदिती आणि राहुल द्रविड हे एकमेकांचे नातेवाईक आहे. राहुल द्रविड अदितीचा चुलत काका आहे. खुद्द अभिनेत्रीनेच एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना याचा खुलासा केला होता. आताही अदितीने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते तिला हा प्रश्न विचारत आहेत.

दरम्यान, अदितीने मालिकांबरोबरच नाटक आणि चित्रपटांतही काम केलं आहे. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटामुळे अदिती चर्चेत आली होती. या सिनेमातील लोकप्रिय ठरलेलं 'मंगळागौर' हे गाणं अदितीने लिहिलं आहे. या गाण्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक झालं होतं. 

Web Title: marathi actress aditi dravid shared photo with cricketer rahul dravid do you know relation between them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.